Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedNUCFDCतर्फे नागरी सहकारी बँकांसाठी ‘सहकार पाठशाळा’ हा नॅशनल ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू

NUCFDCतर्फे नागरी सहकारी बँकांसाठी ‘सहकार पाठशाळा’ हा नॅशनल ट्रेनिंग प्रोग्रॅम सुरू

मुंबई, 12 जून 2025 : नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे (NUCFDC) नागरी सहकारी बँकांसाठी (UCBs) ‘सहकार पाठशाळा’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण आणि क्षमताबांधणी कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या मुख्य कार्यालयात श्री. प्रभात चतुर्वेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी, NUCFDC; श्री. पद्मभूषण बहादुरे, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, NUCFDC; अॅड. श्री. प्रल्हाद कोकरे, अध्यक्ष, कॉसमॉस बँक; आणि श्री. शरद गांगल, अध्यक्ष, टीजेएसबी सहकारी बँक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन सत्र पार पडले. या वेळी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटकातील विविध नागरी सहकारी बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक आणि वरिष्ठ प्रतिनिधी असे 100 हून अधिक वरिष्ठ नेतृत्व सहभागी झाले होते.
या उपक्रमाबद्दल NUCFDCचे सीईओ श्री. प्रभात चतुर्वेदी म्हणाले, ” भविष्यात नागरी सहकारी बँकिंग क्षेत्र उभारण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. सहकार क्षेत्र भक्कम करण्यासाठी ‘सहकार से समृद्धी’ या भारत सरकारच्या व्हिजनशी सुसंगत राहत नागरी सहकारी बँकांचे अनुपालन व्यवस्थापन अधिक बळकट करणे असून, त्यांना अधिक गतिशील, डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज अशा संस्थांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सक्षम करणे हे ‘सहकार पाठशाळा’चे उद्दिष्ट आहे. ही केवळ क्षमताबांधणी नाही तर हा क्षमता परिवर्तन कार्यक्रम आहे. संपूर्ण सहकारी बँक क्षेत्रात गुणवत्ता उंचावणे आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीत नागरी सहकारी बँकांना टिकून राहता यावे यासाठी शाश्वत वाढीचा मार्ग निश्चित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.”
हा अभ्यासक्रम रचनाबद्ध आणि बहुआयामी असून, केवायसी अनुपालन, फसवणुकीच्या धोक्याचे नियंत्रण आणि ट्रेझरी मॅनेजमेंट यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसंदर्भात या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उपयुक्त माहिती मिळते. खास नागरी सहकारी बँकांसाठी तयार करण्यात आलेला हा कार्यक्रम ज्ञान वाढविण्यासाठी उपयुक्त आहेच, त्याचप्रमाणे बँकांना त्यांच्या सभासदांच्या गरजा पूर्ण करण्यात आणि नवीन नियमांशी जुळवून घेण्यात मदत करणेही यामुळे साध्य होते. चांगले प्रशासकीय व्यवस्थापन आणि अनुपालन यावर या उपक्रमामध्ये भर दिला आहे. धोके हाताळण्यासाठी कुशल नेतृत्व तयार करणे, डिजिटल कौशल्य असलेले कर्मचारी घडवणे आणि तंत्रज्ञान व आयटी साधनांचा अधिक चांगला उपयोग करून डिजिटल परिवर्तन वेगाने घडवणे हे यामध्ये महत्त्वाचे घटक आहेत.
NUCFDCतर्फे ‘सहकार पाठशाळा डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म’चेही अनावरण करण्यात आले. गेमच्या स्वरूपात तयार केलेले आणि अनेक भाषांमध्ये उपलब्ध असलेले पोर्टल नागरी सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांना कुठेही आणि कुठल्याही वेळी सहज शिकता येण्याची सुविधा प्रदान करते. टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष श्री. शरद गांगल यांच्या हस्ते या प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. या प्लॅटफॉर्मवर इंग्रजीसह प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये सातत्याने शिकता येईल, अशी सोय करण्यात आली आहे.
याच वेळी, NUCFDCतर्फे ‘सहकार पाठशाळा इंटरॅक्टिव्ह वेबिनार सिरीज’चीही सुरूवात करण्यात आली असून, ही सत्रे दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातील शुक्रवार रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. या वेबिनारद्वारे नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापन यांच्यासाठी सतत संवाद साधण्याचे आणि नवीन गोष्टी शिकण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments