Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसागरी क्षेत्रातील करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रम

सागरी क्षेत्रातील करिअरबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रम

पुणे,18 जून 2025 : 25 जून आंतरराष्ट्रीय नाविक दिनाचे औचित्य साधून पुणे स्थित सागरी क्षेत्रातील संघटना असलेल्या कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स (सीएमएमआय), इन्स्टिट्युट ऑफ मरिन इंजिनिअर्स इंडिया (आयएमईआय),इंडियन मरिटाईम फाऊंडेशन (आयएमएफ) आणि महाराष्ट्र मास्टर्स मरिनर्स असोसिएशन (एमएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार,२१ जून २०२५ रोजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स,शिवाजीनगर येथे सायंकाळी 4 वाजता येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. अशी माहिती इन्स्टिट्युट ऑफ मरिन इंजिनिअर्स इंडिया,पुणेचे अध्यक्ष व माजी मुख्य अभियंते संजीव ओगले, कंपनी ऑफ मास्टर मरिनर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष कॅप्टन मिलिंद फडणीस,सीएमएमआयचे सचिव कॅप्टन किरण जोशी, माजी अध्यक्ष कॅप्टन श्रीरंग गोखले, इंडियन मरिटाईम फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन आनंद दीक्षित, करिअर सल्लागार विवेक वेलणकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

या कार्यक्रमात सागरी क्षेत्रात काम केलेले सुमारे 10 तज्ञ तरूणांचे मार्गदर्शन करतील.यामध्ये मर्चंट नेव्ही व भारतीय नौदलात तरूणांना असलेल्या संधी, त्याला लागणारी शैक्षणिक व शारीरिक पात्रता,अभियांत्रिकी कौशल्य आदी माहिती समाविष्ट असेल.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात प्रवेश करताना चुकीच्या माहितीला बळी पडू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी यावर देखील मार्गदर्शन केले जाईल.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नोंदणीकरिता 9922440667 या क्रमांकावर सकाळी 11 ते 5 या वेळेत संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments