Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedतरूण वयातच सहव्याधी उद्भवल्याने मुत्रपिंडाच्या कर्करोगाचा अधिक धोका - तज्ञ

तरूण वयातच सहव्याधी उद्भवल्याने मुत्रपिंडाच्या कर्करोगाचा अधिक धोका – तज्ञ

पुणे,19 जून 2025 : तरूण वयातच उद्भवणाऱ्या सहव्याधींमुळे आयुष्यातील पुढील टप्प्यात मुत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढत आहे,मात्र जीवनशैलीत बदल केल्यास ही जोखीम लक्षणीयरित्या कमी होऊ शकते असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

जून महिन्यामधील तिसऱ्या गुरुवारी जागतिक मुत्रपिंड कर्करोग दिनानिमित्त या आजाराबाबत जागृती केली जाते.सर्व कर्करोगांपैकी सर्वांत जास्त आढळणारा हा 14 वा सामान्य कर्करोग आहे.याचे प्रमाण सर्व कर्करोगांमध्ये 2 ते 3 टक्के आहे.पाश्चात्य देशांपेक्षा भारतात अधिक तरूण वयात हा कर्करोग आढळत असून साधारणत: वयाच्या 50 च्या आसपास निदान होणारा हा कर्करोग आहे.बहुतांश वेळा हा कर्करोग पुढील टप्प्यात निदान होत असून महिलांपेक्षा पुरूषांमध्ये जास्त आढळतो.

विश्वराज हॉस्पिटल,लोणी येथील वरिष्ठ मुत्ररोग तज्ञ डॉ.संजय धनगर म्हणाले की,तरूण वयातच लठ्ठपणा,उच्च रक्तदाब आणि मधुमेह होत असल्याने कर्करोगाची जोखीम देखील दीर्घकाळ राहते आणि मुत्रपिंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.तरूण वयात हा कर्करोग झाला तर जास्त आक्रमक असतो.मुत्रपिंडाच्या कर्करोगासाठी जोखमीच्या घटकांमध्ये धुम्रपान,लठ्ठपणा,उच्च रक्तदाब आणि या आजाराचा वैद्यकीय इतिहास यांचा समावेश आहे.याशिवाय दीर्घकालीन मुत्रपिंडाचे आजार तसेच व्होन हिप्पेल-लिंडाऊ रोग
किंवा बर्ट हॉग ड्यूब सिंड्रोम यासारखे अनुवंशिक आजार आणि ॲस्बेसटॉस,कॅडमियम,ट्रायक्लोरोइथेलिन (टीसीई) सारख्या रसायनांशी संपर्क या सर्व गोष्टींमुळे जोखीम वाढू शकते.

मात्र जीवनशैलीत बदल केल्यास ही जोखीम लक्षणीयरित्या कमी होऊ शकते,असे डॉ.धनगर म्हणाले.वजन नियंत्रणात ठेवणे,शरीरातील द्रव व पाण्याचे प्रमाण राखणे,सकस व संतुलित आहार, धुम्रपान सोडणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आणि शारीरिक व्यायाम करणे यामुळे मुत्रपिंड कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो, तसेच ज्यांना याचे निदान झाले आहे त्यांचे जगण्याचे प्रमाण वाढू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधे घेऊ नयेत,कारण याचा मुत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो.महत्त्वाची बाब म्हणजे नियमित आरोग्य तपासण्या या प्रभावी उपचार आणि चांगल्या परिणामांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात.

ज्या व्यक्तींना लघवीमध्ये रक्त आढळते (हिमॅट्युरिया), पाठीमध्ये किंवा एका बाजूला दुखापत न होता वेदना होत असतील,काही कारण नसताना वजन कमी होत असेल,थकवा जाणवत असेल,ओटीपोटामध्ये किंवा बाजूला गाठ जाणवत असेल किंवा कोणत्याही कारणाशिवाय ताप येत असेल किंवा रात्री घाम येत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यावा.

मुत्रपिंडाच्या कर्करोगामध्ये अनुवंशिकता ही देखील एक महत्त्वाची बाब आहे आणि एकूण मुत्रपिंड कर्करोगाच्या कर्करोगांपैकी याचे प्रमाण 5 ते 8 टक्के आहे. बहुतांश अशा प्रकारचे कर्करोग अनुवंशिक बदलांशी संबंधित नसले तरी उच्च जोखीम असलेल्या व्यक्ती ओळखण्यासाठी आणि संभाव्य लक्ष्यित उपचारांसाठी अनुवंशिक घटक समजून घेणे गरजेचे आहे.

डॉ.धनगर म्हणाले की,उपचारांमधील प्रगतीमध्ये रूग्णांना दिलासा मिळत असून आशा निर्माण झाली आहे.यामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया,लक्ष्यित उपचार पध्दती (टार्गेटेड थेरपीज) व इम्युनो थेरपी तसेच क्रियोॲब्लेशन आणि रेडिओ फ्रिक्वेंन्सी ॲब्लेशन सारख्या कमीत कमी छेद असलेल्या प्रक्रियांचा समावेश ,आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments