Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedइनस्पिरा सिटी तर्फे भाडेतत्त्वावर घेतलेल्या 20 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचा टप्पा पार;...

इनस्पिरा सिटी तर्फे भाडेतत्त्वावर घेतलेल्या 20 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचा टप्पा पार; गॉडविट कन्स्ट्रक्शन आणि NHK स्प्रिंग्स सोबत महत्त्वपूर्ण करार महाराष्ट्रातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक पार्कपैकी एक असून टियर-2 भागामध्ये दळणवळण आणि उत्पादन केंद्रांची वाढती मागणी असताना उच्च दर्जाच्या उद्योगांना आकर्षित करत आहे

भारत, 20 जून २०२५: छत्रपती संभाजी नगर येथील शेंद्रा एमआयडीसीमध्ये इनस्पिरा रिअॅल्टीने विकसित केलेले 232 एकरचे इनस्पिरा सिटी हे एकात्मिक औद्योगिक आणि गोदाम पार्क हे महाराष्ट्रातील सर्वात सक्रिय औद्योगिक कॉरिडॉरपैकी एक म्हणून लोकप्रियता मिळवत आहे. आतापर्यंत भाडेतत्त्वावर घेतलेल्या 20 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचा टप्पा ओलांडत आणि अनेक उच्च-मूल्य करार सुरू ठेवत या प्रकल्पाने २०२५ मध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

 

 

 

आघाडीवर राहून मागणीतील वाढीचे नेतृत्व करताना गॉडविट कन्स्ट्रक्शनसोबत एक महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. त्यामध्ये 1.1 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राहून अधिक जागा भाडेतत्त्वावर घेतली आहे. राष्ट्रीय उत्पादन आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून छत्रपती संभाजी नगर आणि इनस्पिरा सिटीचा लौकिक यामुळे गॉडविट सारख्या अग्रणी औद्योगिक कंपनीला येथे भाडेतत्त्वावर जागा घेण्यासाठी चालना मिळाली.

 

 

 

आधुनिक उत्पादन युनिटसाठी 3.5 लाख चौरस फूटपेक्षा अधिक जागा भाड्याने घेऊन जापनीज कंपनी NHK स्प्रिंग्सने इनस्पिरा सिटीच्या गतीला आणखी चालना दिली आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील उच्च कार्यक्षमतेच्या स्प्रिंग तंत्रज्ञानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या या कंपनीने येथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे इनस्पिरा सिटीचे सर्व दृष्टीने योग्य स्थान, तयार असलेल्या पायाभूत सुविधा आणि प्रगत उत्पादन व निर्यातमुखी उद्योगांसाठी एक पसंतीचे केंद्र म्हणून निर्माण होत असलेली ओळख अधोरेखित होते.

 

 

 

समृद्धी महामार्ग एक्स्प्रेसवेच्या अगदी जवळ वसलेल्या इनस्पिरा सिटीला उत्कृष्ट रस्ते संपर्काचा लाभ मिळत आहे. त्यामुळे मुंबई, नागपूर, जालना ड्राय पोर्ट आणि महत्त्वाच्या पुरवठा साखळी केंद्रांपर्यंत एका दिवसात पोहोचता येते. 5-स्टार MIDC प्रमाणपत्र, तयार पायाभूत सुविधा आणि तत्काळ वाटपाची सुविधा यामुळे हा पार्क सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), आंतरराष्ट्रीय उत्पादक आणि लॉजिस्टिक सेवा पुरवठादारांना सातत्याने आकर्षित करत आहे. बिडकीन-शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रमुख कंपन्यांकडून गुंतवणुकीची लाट पाहायला मिळत असल्यामुळे शहराचं महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे. त्यात टोयॉटो किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू, सिमेन्स आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे. त्यायोगे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) अंतर्गत या भागाची एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ओळख अधिकच मजबूत झाली आहे. अलीकडील अहवालांनुसार, 22 हून अधिक कंपन्या या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून त्यातून या भागात उच्च संभाव्य औद्योगिक भविष्य असल्याचे प्रतिबिंबित होते.

 

 

 

इनस्पिरा रिअ‍ॅल्टीचे संस्थापक आणि संचालक आयुष मधुसूदन अगरवाल म्हणाले, “गॉडविट कन्स्ट्रक्शन आणि NHK स्प्रिंग्ससारख्या उद्योगजगतातील आघाडीच्या कंपन्यांकडून मिळणारी वाढती मागणी ही इनस्पिरा रिअ‍ॅल्टी टीमच्या दूरदृष्टी आणि समर्पित कामाला मिळालेली पावती आहे. या महत्त्वपूर्ण करारांमधून इनस्पिरा सिटीला एक विश्वासार्ह आणि भौगोलिक दृष्ट्‍या योग्य ठिकाणी असलेले महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्याची आमची बांधिलकी प्रतिबिंबीत होते. लहान आणि मोठ्या सर्व प्रकारच्या व्यवसायांच्या शाश्वत वाढीस पाठबळ देणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासावर आमचा भर आहे. समृद्धी महामार्गाच्या जवळ असल्यामुळे आमच्या प्रकल्पाचे महत्व अधिक वाढते. त्यामुळे महत्त्वाच्या बाजारपेठांशी अखंड संपर्क साधता येतो आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीतील आमच्या भूमिकेला बळकटी मिळते.”

 

 

 

भाडेकराराला मिळत असलेली मजबूत गती आणि ठोस मागणीमुळे इनस्पिरा रिअ‍ॅल्टी भविष्यातील गरजांनुसार तयार औद्योगिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यायोगे स्थानिक रोजगार आणि भारताच्या व्यापक विकासगाथेत योगदान दिले जाईल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments