Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्हॉट्सअॅपवर अधिक चॅनल्स आणि व्यवसाय शोधण्यासाठी उपयुक्त सुविधा

व्हॉट्सअॅपवर अधिक चॅनल्स आणि व्यवसाय शोधण्यासाठी उपयुक्त सुविधा

चॅनल्स आणि स्टेटस ज्यामध्ये असतात त्या आपल्या अपडेट्स टॅबमधील काही नवीन सुविधांची (फीचर्स) आज आपण ओळख करून घेणार आहोत. व्हॉट्सअॅपवर काहीतरी नवीन शोधण्याची एक जागा म्हणून अपडेट्स टॅब विकसित करण्यासाठी आपण गेली दोन वर्षे काम केले आहे. आज दररोज १.५ अब्ज लोक हा टॅब वापरत आहेत. त्यांच्या या उत्साहामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. अॅडमिन्स, संस्था आणि व्यवसायांना व्हॉट्सअॅपमार्फत वाढ साध्य करण्यात आणखी मदत करण्याची आमची इच्छा आहे.

आपण हे तीन मार्गांनी करणार आहोत:

• चॅनल सबस्क्रिप्शन्स: तुम्ही मासिक शुल्क भरून एक्सक्लुजिव अपडेट्स प्राप्त करण्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राइब करू शकता आणि त्या माध्यमातून या चॅनलला पाठिंबा दर्शवू शकता.

• प्रमोटेड चॅनल्स: तुम्ही डिरेक्टरीमार्फत शोध घेत असतानाच, तुम्हाला रुची वाटेल असे नवीन चॅनल्स शोधण्यात आम्ही तुम्हाला मदत करू. प्रथमच अॅडमिन्सना त्यांच्या चॅनलची दृश्यात्मकता (व्हिजिबिलिटी) वाढवण्यासाठी मार्ग उपलब्ध होत आहे.

• अॅड्स इन स्टेटस: तुम्ही नवीन व्यवसाय शोधू शकाल आणि ते स्टेटसमध्ये प्रमोट करत असलेल्या उत्पादनाविषयी किंवा सेवेविषयी त्यांच्याशी सहजपणे संभाषण सुरू करू शकाल.

या नवीन सुविधा केवळ अपडेट्स टॅबवर दिसतील, त्या तुमच्या व्यक्तिगत चॅट्सपासून दूर असतील. याचा अर्थ तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर केवळ मित्रमंडळींशी आणि जवळच्या व्यक्तींशी चॅट करण्यासाठी करत असाल तर तुमच्या अनुभवात अजिबात बदल होणार नाही.

खासगीत्वाचा (प्रायव्हसी) विचार डोक्यात ठेवून तयार केलेल्या जाहिराती

व्हॉट्सअॅपवर आपण नेहमीच करतो त्याप्रमाणे, या सुविधा विकसित करतानाही त्या शक्य तेवढ्या खासगी राखण्यात आल्या आहेत. तुमचे व्यक्तिगत संदेश, कॉल्स आणि स्टेटस एण्ड-टू-एण्ड एन्क्रिप्टेड राहतात, याचा अर्थ कोणीही (अगदी आम्हीही) ते बघू किंवा ऐकू शकत नाही.

स्टेटस किंवा चॅनलवर जाहिराती दाखवताना तुम्हाला काळजी वाटू शकते पण आम्ही अगदीच मर्यादित माहिती घेतो. उदाहरणार्थ, तुमचा देश किंवा शहर, भाषा, तुम्ही फॉलो करत असलेले चॅनल आणि तुम्ही बघत असलेल्या जाहिरातींवर तुमची काय प्रतिक्रिया असते वगैरे. ज्या लोकांनी व्हॉट्सअॅप अकाउंट्स सेंटरवर अॅड करण्याचा पर्याय स्वीकारला आहे, त्यांचे जाहिरात प्राधान्यक्रम आणि मेटा अकाउंट्सवरील माहिती यांचा वापर आम्ही करू.

आम्ही तुमचे फोन क्रमांक कधीही जाहिरातदारांना विकणार किंवा पाठवणार नाही. तुमचे व्यक्तिगत संदेश, कॉल्स किंवा तुम्ही ज्या ग्रुप्समध्ये असाल ते ग्रुप यांचा वापर तुम्हाला दाखवल्या जाणाऱ्या जाहिराती निश्चित करण्यासाठी कधीही केला जाणार नाही.

तुमच्या अनेक वर्षांच्या व्यक्तिगत संभाषणांमध्ये (पर्सनल चॅट्स) अडथळा आणणार नाही असा व्यवसाय उभा करण्याबाबत आम्ही चर्चा करत आहोत आणि अपडेट्स टॅब ही अशा नवीन सुविधा उपयोगात आणण्यासाठी योग्य जागा आहे, असे आम्हाला वाटते. याचा उपयोग करू इच्छिणाऱ्या व्यवसायांनी व चॅनल अॅडमिन्सनी याबाबत अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments