दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरसाठी ७०० ते ७४० रुपयांचा किंमतपट्टा निश्चित.
· शेअरची किमान किंमत (फ्लोअर प्राईज) ही इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या ७० पट आहे आणि कमाल किंमत (कॅप प्राईज) ही दर्शनी मूल्याच्या ७४ पट आहे.
· बोली / ऑफर बुधवारी, २५ जून २०२५ रोजी सुरू होऊन शुक्रवारी, २७ जून २०२५ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख मंगळवार, २४ जून २०२५ असेल.
· किमान २० इक्विटी शेअर्ससाठी व त्यानंतर २० शेअर्च्या पटीतच बोली लावता येईल.
· आरएचपी लिंक : https://www.jmfl.com/Common/getFile/5011
या दस्तऐवजामध्ये अमेरिकेत विक्री करण्यासाठीच्या कोणत्याही भांडवली साधनांची (सिक्युरिटीजची) ऑफर करण्यात आलेली नाही. अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज कमिशनकडे नोंदणी केली नसेल किंवा अमेरिकेत नोंदणी करावयापासून सूट मिळालेली नसेल, किंवा यूएस सिक्युरिटीज अॅक्ट १९३३ (सुधारित) अंतर्गत नोंदणी आवश्यक नसलेले व्यवहार करायचे असतील, तर त्यामध्ये सिक्युरिटीजची ऑफर किंवा विक्री करता येत नाही. या सिक्युरिटीजसाठी अमेरिकेमध्ये कोणतीही सार्वजनिक विक्री करण्यात येणार नाही.
मुंबई, २१ जून २०२५ : एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (एचडीबी फायनान्शियल किंवा “कंपनी”) प्राथमिक समभाग विक्रीची सुरुवात बुधवार, दि. २५ जून २०२५ रोजी होणार आहे
या आयपीओमध्ये अॅंकर गुंतवणूकदारांसाठी बोलीची तारीख मंगळवार, २४ जून २०२५ ही ठरविण्यात आली आहे. बोली / ऑफर शुक्रवार, दि. २७ जून २०२५ रोजी बंद होईल. ही बोली किमान २० इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर २० शेअर्सच्या पटीनेच करता येईल. (“बिड डिटेल्स”)
या ऑफरसाठी ७०० ते ७४० रुपये प्रति इक्विटी शेअर असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या ऑफरचा एकूण आकार १२,५०० कोटी (१२५,००० दशलक्ष) आहे. त्यात २,५०० कोटी (२५,००० दशलक्ष) रुपयांच्या नव्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. तसेच १०,००० कोटी (१,००,००० दशलक्ष) इतक्या शेअर्ससाठी विक्रीसाठीचा प्रस्ताव (“टोटल ऑफर साईझ”) या आयपीओमध्ये समाविष्ट आहे.
नवीन इश्यूमधून मिळणारी निव्वळ रक्कम कंपनीचा टियर-१ भांडवली आधार वाढवण्यासाठी वापरली जाणार आहे, जेणेकरून भविष्यात भांडवलाच्या गरजा पूर्ण करता येतील. यामध्ये कंपनीच्या कोणत्याही व्यवसाय शाखांखालील (उदा. एंटरप्राइझ लेंडिंग, अॅसेट फायनान्स आणि कंझ्युमर फायनान्स) पुढील कर्जवाटपाचाही समावेश आहे. याशिवाय, नव्या इश्यूतील काही निधी ऑफरचा खर्च भागवण्यासाठी वापरला जाईल. (“ऑबजेक्ट्स दि द ऑफर”)
एचडीएफसी बँक लिमिटेड (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर”) यांच्याकडून १०,००० कोटी (१,००,००० दशलक्ष) रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा विक्रीचा प्रस्ताव (ऑफर फॉर सेल) यामध्ये समाविष्ट आहे.
हे इक्विटी शेअर्स कंपनीच्या १९ जून २०२५ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर करण्यात येत आहेत. हा आरएचपी गुजरात, दादरा व नगर हवेली या भागांसाठीच्या अहमदाबादमधील कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे (आरओसी) दाखल करण्यात आला आहे. या इक्विटी शेअर्सचे लिस्टिंग बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) येथे होणार असून, एनएसई हे नामनिर्दिष्ट स्टॉक एक्सचेंज असेल.
ही इश्यू प्रक्रिया एससीआरआरमधील नियम १९(२)(ब) व सेबी आयसीडीआर नियमावलीतील नियम ३१ यांच्या अधीन राहून पार पडत आहे. सेबी आयसीडीआरच्या नियमावलीतील नियम ६(१) नुसार बुक बिल्डिंग पद्धतीने ही शेअर्सची विक्री केली जात आहे. यामध्ये कमाल ५० टक्के शेअर्स “प्रमाणानुसार वाटप” तत्त्वावर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (क्यूआयबी) दिले जातील (या भागाला क्यूआयबी हिस्सा असे म्हटले जाते). यापैकी, ६० टक्क्यांपर्यंतचा हिस्सा बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्यानुसार अँकर गुंतवणूकदारांना स्वविवेकाधीन पद्धतीने वाटपासाठी कंपनी राखीव ठेवू शकते. या भागाला “अँकर गुंतवणूकदार हिस्सा” म्हटले जाईल. या अँकर गुंतवणूकदारांसाठीच्या हिश्श्यापैकी एकतृतीयांश हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडसाठी राखीव असेल. त्यांनी सेबी आयसीडीआर नियमावलीनुसार अँकर गुंतवणूकदार वाटप किमतीपेक्षा जास्त किंवा समान दराने वैध बोली लावणे अपेक्षित आहे. जर अँकर हिस्सा कमी भरला गेला अथवा न भरला गेल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स हे क्यूआयबी भागात (अँकर भाग वगळता) समाविष्ट केले जातील याला “नेट क्यूआयबी हिस्सा” म्हटले जाते.
याव्यतिरिक्त, नेट क्यूआयबी वाटपातील ५ टक्के हिस्सा केवळ म्युच्युअल फंडांसाठी प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल, यासाठी वैध बोली ऑफर किमतीइतकी किंवा त्याहून अधिक असाव्यात. उर्वरित नेट क्यूआयबी हिस्सा (अँकर गुंतवणूकदार वगळता) सर्व पात्र संस्थागत गुंतवणूकदारांना, म्युच्युअल फंडांसह, प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध राहील, यासाठी अट म्हणजे वैध बोली ऑफर किमतीइतकी किंवा त्याहून अधिक असावी. तसेच, कर्मचाऱ्यांच्या राखीव हिश्श्यासाठी बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना आणि एचडीएफसी बॅंकेच्या शेअरधारकांसाठी राखीव असणाऱ्या हिश्श्यासाठी बोली लावणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या पात्र समभागधारकांना, त्यांनी ऑफर किमतीइतकी किंवा त्याहून अधिक रकमेची बोली लावल्यास, समभागांचे वाटपही प्रमाणानुसार केले जाईल.
याशिवाय, नेट ऑफरपैकी किमान १५ टक्के हिस्सा बिगर-संस्थात्मक बोलीदारांना (“नॉन इन्स्टिट्यूशनल कॅटेगरी”) वाटपासाठी उपलब्ध असेल. यातील एक तृतीयांश हिस्सा हा दोन लाख ते १० लाख इतक्या रकमेची बोली लावणाऱ्या बोलीदारांसाठी राखीव असेल; तर उर्वरित दोन तृतीयांश हिस्सा हा १० लाखांपेक्षा अधिकच्या रकमेची बोली लावणाऱ्या बोलीदारांसाठी राखीव असेल. या दोन उपगटांपैकी कोणत्याही उपगटात अल्पविक्री झाल्यास, त्यातील उर्वरित समभाग इतर उपगटातील पात्र बोलीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार वाटप करता येतील. या वाटपासाठी या बोलीदारांची बोली ऑफर किमतीइतकी किंवा त्याहून अधिकची असावी. याशिवाय, सेबी आयसीडीआरच्या नियमानुसार, नेट ऑफरपैकी किमान ३५ टक्के हिस्सा किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (“रिटेल कॅटेगरी”) वाटपासाठी उपलब्ध असेल. त्यांनीही ऑफर किमतीइतक्या किंवा त्याहून अधिक दराने वैध बोली दिलेली असावी.
सर्व बोलीदारांना (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता) ‘अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट’ (“एएसबीए”) प्रक्रियेचा वापर करणे अनिवार्य आहे. आपल्या संबंधित एएसबीए खात्याचा तपशील आणि ‘आरआयबी यूपीआय मेकॅनिझम’ वापरत असल्यास ‘यूपीआय’चा आयडी त्यांना याकरीता द्यावा लागेल. त्यानुसार त्यांच्या संबंधित बोलीची रक्कम ‘सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकां’द्वारे (“एससीएसी”) किंवा यूपीआय यंत्रणेंतर्गत प्रायोजक बँकेद्वारे, संबंधित बोली रकमेच्या मर्यादेपर्यंत ब्लॉक केली जाईल. ‘अँकर इन्व्हेस्टर्स’ना ‘एएसबीए’ प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक माहितीसाठी आरएचपीच्या पृष्ठ क्रमांक ५३८ वरील ऑफर प्रोसिजर हा तपशील पाहावा.
या ऑफरसाठी जेएम फायनान्शियल लिमिटेड, बीएनपी पॅरिबा, बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अॅन्ड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (पूर्वीचे नाव आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड), जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स लिमिटेड, नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अॅन्ड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि यूबीएस सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) म्हणून नियुक्त आहेत.
येथे वापरलेले पण परिभाषित न केलेले सर्व भांडवली शब्द “रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस”मधील अर्थानुसारच ग्राह्य धरले जातील.


