Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedराज्य महिला आयोगाच्या निर्देशाने संरक्षण अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाही पीडित महिला व...

राज्य महिला आयोगाच्या निर्देशाने संरक्षण अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाही पीडित महिला व मुलीला बेघर होण्यापासून दिलासा

पुणे, दि. 23 : राज्य महिला आयोगाने शिफारस केलेल्या एका महत्वपूर्ण प्रकरणात वडगाव मावळ येथील संरक्षण अधिकारी प्रवीण नेहरकर यांनी तत्काळ कार्यवाही केल्यामुळे एका निराधार विधवा महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला बेघर होण्यापासून दिलासा मिळाला.

 

राज्य महिला आयोगाने वडगाव मावळच्या संरक्षण अधिकाऱ्यांकडे शुक्रवारी (दि. १३) अतिशय संवेदनशील प्रकरण सोपविले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी पुणे यांच्या कार्यालयातून या प्रकरणाच्या अनुषंगाने कागदपत्रे मिळाली. या प्रकरणातील पीडित महिलेच्या पतीचे सन २०२३ मध्ये निधन झाल्यामुळे ती आणि तिची अल्पवयीन मुलगी पूर्णपणे निराधार झाली. मावळ-मुळशी येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या एका आदेशामुळे पीडित महिला व मुलीला त्यांच्या राहत्या घरातून बाहेर जावे लागणार होते.

 

कागदपत्रे मिळताच श्री. नेहरकर यांनी पीडित महिलेचा कौटुंबिक घटनेचा अहवाल (डीआयआर) तयार करुन मंगळवार १७ जून रोजी वडगाव मावळ न्यायालयात दाखल केला. वकिलाची अनुपस्थिती असतानाही श्री. नेहरकर यांनी स्वतः महिलेची बाजू अतिशय प्रभावीपणे मांडल्यामुळे आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन न्यायालयाने त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत निवासाचा अंतरिम आदेश पारित केला.

 

यामुळे महिलेला तात्काळ मोठा दिलासा मिळाला. या यशानंतर संरक्षण अधिकाऱ्यांनी लगेचच दुसऱ्या दिवशी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून या महिलेला वकीलही मिळवून दिला, जेणेकरून तिच्या कायदेशीर लढ्याला बळकटी मिळेल. न्यायालयाने केवळ अंतरिम आदेशच दिला नाही, तर तत्काळ सुनावणीची पुढील तारीखही निश्चित केली, जेणेकरुन पीडितेला न्याय मिळण्यास कोणताही विलंब होणार नाही, असे श्री. नेहरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

00000

Previous article
Next article
पुणे दि.23: घोले रोड येथील शासकीय तांत्रिक विद्यालयात इयत्ता 11 वी द्विलक्षी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू असून संस्थेशी संलग्न महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन द्विलक्षी अभ्यासक्रमांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय तांत्रिक विद्यालयात मेकॅनिकल मेन्टेनन्स आणि इलेक्ट्रिकल मेन्टेनन्सच्या प्रत्येकी 100 जागा, स्कुटर मोटार सायकल सर्व्हिसिंग- 50, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाच्या 50 जागांचा उपलब्ध आहेत. आबासाहेब गरवारे महाविद्यालय, फर्ग्यूसन महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, पूना कॉलेज, एस. एम. एन. कनिष्ठ महाविद्यालय, अभिषेक विद्यालय चिंचवड, नूतन मराठी विद्यालय (मुलींचे) या नामांकित विद्यालयात 1 हजार 200 रुपये प्रवेश शुल्क भरुन या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशाबाबत अधिक माहितीकरीता 9822109175, 9527433345, 8975789455, 9822331775, 9922443626 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. पुरी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. 00000
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments