Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedएकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातर्गंत अर्ज करण्याचे आवाहन

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातर्गंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 23 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2025-26 अंतर्गत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

 

या अभियानांतर्गत विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, ‘प्रथम अर्ज, प्रथम लाभ’ या तत्त्वावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्ज करताना शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) असणे आवश्यक आहे.

 

कृषी विभागाच्या मसाला पिके, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, पॉलिहाऊस, प्लास्टिक मल्चिंग, पॅक हाऊस, कांदाचाळ, यांत्रिकीकरण, मशरूम उत्पादन आणि काढणी पश्चात व्यवस्थापन या घटकांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

 

0000

Previous article
पुणे दि.23: घोले रोड येथील शासकीय तांत्रिक विद्यालयात इयत्ता 11 वी द्विलक्षी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू असून संस्थेशी संलग्न महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन द्विलक्षी अभ्यासक्रमांची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय तांत्रिक विद्यालयात मेकॅनिकल मेन्टेनन्स आणि इलेक्ट्रिकल मेन्टेनन्सच्या प्रत्येकी 100 जागा, स्कुटर मोटार सायकल सर्व्हिसिंग- 50, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमाच्या 50 जागांचा उपलब्ध आहेत. आबासाहेब गरवारे महाविद्यालय, फर्ग्यूसन महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, पूना कॉलेज, एस. एम. एन. कनिष्ठ महाविद्यालय, अभिषेक विद्यालय चिंचवड, नूतन मराठी विद्यालय (मुलींचे) या नामांकित विद्यालयात 1 हजार 200 रुपये प्रवेश शुल्क भरुन या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशाबाबत अधिक माहितीकरीता 9822109175, 9527433345, 8975789455, 9822331775, 9922443626 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. पुरी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. 00000
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments