पुणे पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगाने आज संपूर्ण पुणे शहरात शांतता पुणेकर वाचत आहेत! हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नामदार चंद्रकांतदादा पाटील हे देखील या उपक्रमात सहभागी झाले असून, विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान वेळ काढून नामदार पाटील यांनी महेश तेंडुलकर लिखित शिवकालातील दुर्ग व दुर्ग व्यवस्था हे पुस्तक वाचले.


