पुणे, दि.११ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दाखवलेल्या मार्गावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाटचाल करीत असून धर्माचा आणि कर्माचा समतोल ‘सब का साथ सब का विकास’ या मंत्रानुसार सर्व समाज घटकांचा विकास ते करत आहेत, अशी भावना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केली. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून धनगर समाज बांधवांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी शुभारंभ लॉन्स येथे आयोजित ‘सकल धनगर समाज’ मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतीय संस्कृतीच्या रक्षणाचे महान कार्य केले. त्याच बरोबर सामान्य नागरिकांचा विकास व्हावा यासाठी देखील त्या सदैव प्रयत्नशील होत्या. अहिल्यादेवींनी दाखवलेला मार्ग स्वीकारत त्यांच्यानंतर देशातील तीर्थक्षेत्रांचा व सामान्य नागरिकांचा विकास करण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.
सर्व समाज घटकांना समान संधी देण्याची भूमिका त्यांनी घेतली असून धनगर समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय ते कधीही होऊ देणार नाहीत, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, भाजप शहर उपाध्यक्ष ऍड गोविंद देवकाते, महा ऍग्रीचे व्यवस्थापकीय संचालक ऍड. विजय गोफणे, भटके विमुक्त विकास परिषदेचे स्वामी धनगर हे उपस्थित होते.
धनगर समाजामध्ये उद्योग क्रांती घडली पाहिजे. त्यामुळे धनगर समाजाने आपल्या सामाजिक उन्नतीविषयी उदासीन राहणे सोडून द्यावे व विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत असे मत ऍड. विजय गोफणे यांनी व्यक्त केले.
यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत धनगर महिला व युवक-युवतींनी सरकारच्या या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारणीकडे लक्ष द्यावे. जेणेकरून धनगर समाजातील तरुण हे देखील रोजगार देणारे बनतील व आपल्या समाज बाधवांपुढे नवा आदर्श उभा करतील, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
धनगर समाजासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. परंतु समाज बांधवांना याविषयी अधिक माहिती नाही व सरकारी कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे या योजनांपासून ते वंचित राहत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये भटके विमुक्त विकास परिषदेने याकडे लक्ष देऊन हजारो समाज बांधवांच्या सरकारी कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला आहे, अशी माहिती स्वामी धनगर यांनी दिली.
धनगर समाजाने कायमच देशाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान दिले आहे. समाज बांधवांनी पुढे येऊन सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपला विकास साधावा, त्यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा आपण करू, असे मत भाजपा प्रदेश सचिव नवनाथ पडळकर यांनी व्यक्त केले.
>>
*चौकट*
समाजासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान…
भटके विमुक्त विकास परिषदेचे स्वामी धनगर, भाजप पुणे उपाध्यक्ष ऍड गोविंद देवकाते, अहिल्याबाई होळकर समाजसेवी संघाच्या अध्यक्षा मनीषा शेळके, मनीषा बावधने, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त दिलीप बावधने सर, शोभा पोरवा, सकल धनगर समाजाचे अध्यक्ष भगवान शिंदे, उल्का मोकाजदार, अशोक बुरटे, संतोष वरग, हिंदू धनगर क्रांती मोर्चाचे संतोष बावधने, पी के ढेबे सर, उद्योजक एन जे खरात, दीपक आखाडे, भारतीय युवक व्यायाम व कल्याण संघाचे पी के बावधने, हरिभाऊ वाघमोडे, उद्योजक आनंद शिंगाडे, सूत्रसंचालक विकास माने, तुषार, नानासाहेब बावधने, प्रकाश बावधने, राजेशिवराय प्रतिष्ठान चे शिवाजी खरात, राजेश कोकरे, मंगेश मासाळ आदी मान्यवरांचा देवधर यांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.
>>
*चौकट*
नऊ वर्षांची दुर्वा व नव्वद वर्षांची दुर्गा आली भेटीला…
आपल्या राष्ट्रवादी विचारांसाठी सुपरिचीत सुनील देवधर यांची समाज माध्यमांवर देखील लोकप्रियता वाढत आहे. युट्यूबवरील त्यांची व्याख्याने ऐकून पुणे शहरातील नऊ वर्षांची लहानगी दुर्वा आणि नव्वद वर्षांच्या दुर्गा आजी खास देवधर यांना भेटण्यासाठी कार्यक्रम स्थळी आल्या होत्या. यावेळी देवधर यांनी दुर्गाबाईंना साष्टांग नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच लहानग्या दुर्वाचा वाढदिवस असल्यामुळे देवधर यांनी पुस्तकांचा संच तिला जन्मदिवसाची भेट म्हणून दिला.
>>