*
पुणे : पतित पावन संघटनेच्या बुधवार चौक, मजूर अड्डा या ठिकाणी नवीन शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी पतित पावन संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव चव्हाण, भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक हेमंत रासने, निलेश कदम, शाखेचे मार्गदर्शक पै. राजाभाऊ सांगळे, उमेश चव्हाण, मनसे चे प्रल्हाद गवळी, शिवसेनेचे समन्वयक धनंजय जाधव, पुणे शहर अध्यक्ष स्वप्निल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रवीण झंवर, पुणे शहर सरचिटणीस विक्रम मराठे, ललित खंडाळे, गुरु कोळी, संतोष शेंडगे, यादव पुजारी, मिलिंद तिकाणे, अजय कवठे, प्रसाद वायकर, ध्रुव जगताप, अशोक परदेशी, विजय क्षीरसागर, आप्पा पोटे, योगेश शिर्के यांसह अन्य कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
पुणे शहराध्यक्ष स्वप्निल नाईक म्हणाले, पुढील काळामध्ये सामाजिक बांधिलकी या नात्याने समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये शाखेचे सर्व पदाधिकारी कार्यरत राहणार आहेत. तसेच मजुरांसाठी योग्य त्या उपाययोजना देखील राबविण्यात येणार आहेत. पुणे शहरामध्ये पतित पावन संघटनेच्या १०० शाखा स्थापन करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नवनिर्वाचित शाखा प्रमुख विराज सांगळे, उपाध्यक्ष कमलेश रायपल्ली, शाखाध्यक्ष सिद्धार्थ सांगळे, संपर्क प्रमुख अनुज महाजन, सचिव पवन जाधव, शुभम सांगळे, रवी बोधक, जॉर्ज बोधक यांनी संघटनेच्या नवीन जबाबदारी स्वीकारल्या.