आशियातील रोबोटिक सर्जरीचे प्रणेते असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल्सचे ऑर्थोपेडिक, न्यूरोसायन्सेस , कार्डिऍक सायन्सेस, कर्करोग उपचार, ट्रॉमा व क्रिटिकल केअर उत्कृष्टता केंद्रांसह सर्वसमावेशक बहुशाखीय रुग्णालयांची साखळी मध्ये रूपांतर करण्याच्या दृष्टीने उनाप्राईम हेल्थकेअर एलएलपी तर्फे 84.5 टक्के हिस्सा संपादित
पुणे,3 जुलै 2025 : रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये आशियातील अग्रगण्य रूग्णालय असलेल्या व ५० हुन अधिक वर्षांचा वारसा असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल्सने उनाप्राईम हेल्थकेअर एलएलपी ने केलेल्या गुंतवणूकीसह धोरणात्मक विस्ताराची घोषणा केली. उनाप्राईम इनव्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स ने स्थापित केलेल्या स्पेशल पर्पझ व्हेईकल (एपीव्ही) च्या माध्यमातून महाराष्ट्र स्थित व रूग्णालयांची साखळी असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल्समध्ये सुमारे 84.5 टक्के हिस्सा संपादित केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्वात आधुनिक मल्टीस्पेशालिटी व क्वार्टनरी केअर रुग्णालय साखळ्यांपैकी पैकी एक अशी ओळख निर्माण होईल.
या व्यवहारात टाटा हेल्थ केअर फंडकडे असलेल्या पूर्वीच्या हिस्सेदारीचे उनाप्राईम हेल्थकेअर एलएलपी तर्फे संपादन आणि संस्थेच्या महत्त्वाकांक्षी विस्तार योजनांना बळ देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्राथमिक भांडवल उभारणीचा समावेश आहे. उनाप्राईम हेल्थकेअर एलएलपीला प्रख्यात देशांतर्गत संस्थांचे पाठबळ असून यामध्ये भारतात बहु-अवयव प्रत्यारोपण आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले ग्लोबल हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.के.रविंद्रनाथ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञ श्री.मनप्रीत सोहल यांचा समावेश आहे.
लोकमान्य हॉस्पिटल्सचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनप्रीत सोहल यांच्या धोरणात्मक नेतृत्वाखाली आणि लोकमान्य हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व मुख्य सांधेरोपण शल्यचिकित्सक डॉ.नरेंद्र वैद्य आणि अवयव प्रत्यारोपण प्रणेते डॉ.के रविंद्रनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटल्सने महत्त्वकांक्षी विस्तार योजना आखली आहे.यामध्ये पुढील 3 ते 4 वर्षात 300 बेडस पासून 800 बेडसपर्यंतचा विस्तार, त्याचबरोबर हृदयरोग चिकित्साशास्त्र (कार्डियाक सायन्सेस), मज्जातंतू शास्त्र (न्युरोसायन्सेस), व्यापक कर्करोग उपचार, जनरल व जीआय सर्जरी आणि बहु-अवयव प्रत्यारोपण यासाठी पुणे आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये जागतिक दर्जाचे उत्कृष्टता केंद्रे यांचा समावेश आहे.
2029 पर्यंत महाराष्ट्रातील अग्रगण्य मल्टीस्पेशालिटी व क्वार्टनरी केअर हॉस्पिटल साखळी म्हणून आपले स्थान बळकट करण्याचे लोकमान्य हॉस्पिटल्सचे उद्दिष्ट आहे. प्रगत प्रत्यारोपण सुविधा, व्यापक कर्करोग उपचार सुविधा, रोबोटिक शस्त्रक्रिया आणि न्युरोलॉजिकल व आर्थोपेडिक सेवा, हृदय चिकित्साशास्त्र, जनरल व जीआय सर्जरी, आँकोलॉजी, ट्रॉमा व क्रिटिकल केअर यांच्या संयोजनासह संस्थेचा एकात्मिक दृष्टीकोन यामुळे भारतातील प्रमुख केंद्र म्हणून स्थापित होईल.
याप्रसंगी लोकमान्य हॉस्पिटल्सचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनप्रीत सोहल म्हणाले की, उनाप्राईम हेल्थकेअर एलएलपी सोबतची ही भागीदारी लोकमान्य हॉस्पिटल्ससाठी एक परिवर्तनाचा क्षण असून महाराष्ट्रातील प्रमुख मल्टीस्पेशालिटी व क्वार्टनरी केअर हॉस्पिटल चेन म्हणून विकसित होण्यास मदत होईल. या मोठ्या गुंतवणूकीमुळे रोबोटिक शस्त्रक्रियांमधील आमच्या कौशल्याची व्यापक क्वार्टनरी केअर क्षमतांशी सांगड घालता येईल व यामुळे आरोग्य सेवेतील एक प्रमुख राष्ट्रीय केंद्र म्हणून ओळख प्राप्त होईल. बहुअवयव प्रत्यारोपण आणि व्यापक कर्करोग उपचार सेवा यांमुळे भारतभरातील आरोग्यसेवांच्या गरजांची पूर्तता करू शकू,असा आम्हाला विश्वास आहे.
लोकमान्य हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व मुख्य सांधेरोपण शल्यचिकित्सक डॉ.नरेंद्र वैद्य म्हणाले की, आशियामधील रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये अग्रगण्य संस्था म्हणून पाया रचल्यानंतर आम्ही आता महाराष्ट्रातील सर्वांत प्रगत मल्टीस्पेशालिटी व क्वार्टनरी केअर हॉस्पिटल साखळी स्थापन करण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरूवात करत आहोत. व्यापक उपचार सेवांमधील आमच्या विस्तारामुळे भारतातील रूग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होतील.
उनाप्राईम इनवेस्टमेंट ॲडव्हायझरचे संस्थापक दीप मिश्रा म्हणाले की, व्यापक प्रत्यारोपण सेवा स्थापित करण्याची लोकमान्यची वचनबध्दता भारताच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये एक लक्षणीय प्रगती दर्शविते. त्यांच्या स्थापित रोबोटिक शस्त्रक्रिया उत्कृष्टततेसह प्रगत प्रत्यारोपण क्षमता याचे संयोजन देशभरातील रूग्णांसाठी एक अद्वितीय आरोग्य सेवा केंद्र स्थापन करेल आणि वैद्यकीय उत्कृष्टता आणि परिणामांमध्ये नवा मापदंड स्थापित होईल.
गुंतवणूक व विस्ताराची वैशिष्टये :
धोरणात्मक गुंतवणूक – उनाप्राईम हेल्थकेअर एलएलपीकडून 84.5 टक्के भागभांडवल संपादनासाठी व पुढील विस्तारासाठी आणखी गुंतवणूक
क्षमतावाढ – 3 ते 4 वर्षांत 300 हून अधिक बेड्स वरून 800 हून अधिक बेड्स असा 160 टक्केहून अधिक बेड्सचा विस्तार
भौगोलिक उपस्थिती – पुण्यातील चार युनिटससह विस्तार योजना व मुंबई आणि कोल्हापूरमध्ये शस्त्रक्रियेसाठी सहयोग
चिकित्सा उत्कृष्टता – आजवर 1,50,000 हून अधिक रूग्णांवर उपचार,50,000 हून अधिक गुडघेरोपण प्रक्रिया,15,000 हून अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया


