Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedकूपर कॉर्पोरेशन आणि सिन्फोनिया टेक्नॉलॉजी (जपान) यांची भागीदारी; भारतातील पहिला सीपीसीबी IV+...

कूपर कॉर्पोरेशन आणि सिन्फोनिया टेक्नॉलॉजी (जपान) यांची भागीदारी; भारतातील पहिला सीपीसीबी IV+ प्रमाणित 10 kVA क्षमतेचा एलपीजी जनसेट लाँच करण्याची घोषणा

सातारा : इंजिन, जेनसेट आणि ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात भारतात आघाडीवर असलेल्या कूपर कॉर्पोरेशनने प्रगत ऊर्जा उपाययोजनांमध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या जपानमधील सिन्फोनिया टेक्नोलॉजीसोबत महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीमुळे अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक दशकांचा अनुभव, सखोल वारसा आणि पर्यावरणस्नेही ऊर्जा क्षेत्रात नवकल्पनांना गती देण्याच्या समान उद्दिष्टांची सांगड घातली गेली आहे.

 

भारताच्या ऊर्जा क्षेत्राला नवी दिशा देणारी ही दूरदृष्टीपूर्ण भागीदारी आज अधिकृत स्वरूपात साकार होत आहे. या निमित्ताने ‘डायमॉन जनसेट’ हा भारतातील पहिला सीपीसीबी IV+ प्रमाणित 10 kVA क्षमतेचा एलपीजी जनसेट लाँच करण्यात येत आहे. अधिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक वीज निर्मितीचा नवा मानदंड ठरवणारा हा जनसेट केवळ कूपर कॉर्पोरेशनकडून उत्पादित करण्यात येईल. संपूर्ण भारतभर त्याची संयुक्तपणे विक्री करण्यात येईल आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही निर्यात करण्यात येईल. दोन्ही कंपन्यांची तंत्रज्ञानविषयक प्रगती, ऊर्जा कार्यक्षमतेचा प्रचार आणि पर्यावरणाप्रती बांधिलकी यांचे हे द्योतक आहे.

 

कूपर सिन्फोनिया जनसेट — मॉडेल CSG-0010L-IN — या जेनसेटची भारतात ‘डायमॉन’ या ब्रँड नावाखाली विक्री करण्यात येणार आहे. हे नाव सिन्फोनिया टेक्नॉलॉजीचे मुख्यालय असलेल्या जपानमधील शहरावरून ठेवण्यात आले आहे. तर जपानी बाजारपेठेत या उत्पादनाला ‘सातारा’ हे नाव देण्यात येईल. कूपर कॉर्पोरेशनच्या एक शतकाहून अधिक काळाच्या वारशाला मानवंदना देणारे हे नाव या ऐतिहासिक शहराच्या गौरवासाठी ठेवण्यात आले आहे. हा अद्वितीय जनसेट उत्कृष्ट कामगिरी, इंधन बचत आणि विश्वासार्हता यांचा उत्तम समतोल साधतो. कॉम्पॅक्ट डिझाइन, कमी ऑपरेशनल खर्च आणि सुलभ देखभाल यामुळे पारंपरिक डिझेल जनसेट्स आणि ग्रिड वीजेच्या तुलनेत हा एक अधिक सक्षम आणि किफायतशीर पर्याय ठरतो. एलपीजीसारख्या स्वच्छ आणि शाश्वत इंधनावर चालणारा डायमॉन जनसेट पर्यावरणावर अत्यल्प परिणाम करतो, तसेच ऊर्जा कार्यक्षमतेत कमाल साधतो.

 

कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.फारोख एन. कूपर या धोरणात्मक भागीदारीबद्दल आपले व्हिजन शेअर करताना म्हणाले, “सिन्फोनिया टेक्नोलॉजीसोबतची ही भागीदारी म्हणजे ऊर्जा क्षेत्राला स्वच्छ, स्मार्ट उपाययोजना उपलब्ध करून देऊन या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने उचललेले अर्थपूर्ण पाऊल आहे. प्रगती नेहमी सहकार्यातूनच घडते या आमच्या धारणेचा परिपाक म्हणजे डायमॉन जेनसेट. या निमित्ताने जपानी अचूकता व भारतीय इंजिनीअरिंग यांची एका निश्चित उद्दिष्टाने सांगड घालण्यात आली आहे. सीपीसीबी IV+ अनुकूल आणि उच्च कार्यक्षमतेचे एलपीजी जनसेट्स उपलब्ध करून देताना, उद्योगांना विश्वासार्हता किंवा कार्यक्षमतेशी तडजोड न करता शाश्वत आणि वाजवी किमतीत फायदेशीर ऊर्जा उपाययोजनांचा अवलंब करता यावा, हा आमचा प्रयत्न आहे.

 

सिन्फोनिया टेक्नॉलॉजी कं. लि. यांच्या सोशल इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम सेल्स विभागाचे जनरल मॅनेजर माकोटो सायटो म्हणाले, “कूपर कॉर्पोरेशनसोबतची ही भागीदारी जगभरात शाश्वत आणि उच्च कार्यक्षमतेचे ऊर्जा उपाय प्रदान करण्याच्या आमच्या सामायिक दृष्टिकोनाची पुष्टी करते. डायमॉन जनसेटमध्ये जपानी अचूक अभियांत्रिकी आणि भारताची उत्पादनक्षमता यांचा संगम आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्वोत्कृष्ट मानकांना पूरक असलेले उत्पादन साकारले गेले आहे. स्वच्छ ऊर्जा सर्वांसाठी अधिक सुलभ करण्याच्या दिशेने या भागीदारीतून आम्ही एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहोत, आणि अधिक हरित भविष्यासाठी सकारात्मक प्रगती घडवत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.”

 

डायमॉन जनसेट हा एक क्रांतिकारी 10 kVA एलपीजी जनसेट असून तो केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या IV+ (सीपीसीबी IV+) मानकांचे पूर्णतः पालन करतो. ही मानके भारतातील सर्वात कडक उत्सर्जन नियम असून, वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि शाश्वत ऊर्जेचा प्रचार करण्यासाठी लागू करण्यात आली आहेत. पर्यावरणस्नेही कामगिरी, इंधन कार्यक्षमता आणि प्रगत अभियांत्रिकी यामध्ये नवा मापदंड ठरवणाऱ्या या जनसेटमध्ये कूपरने देशातच विकसित केलेले लीन-बर्न गॅस इंजिन वापरण्यात आले आहे, जे युकेमधील रिकार्डो कंपनीच्या सहकार्याने डिझाइन करण्यात आले आहे. या जनसेटमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिन मॅनेजमेंट सिस्टम, आयसोक्रोनस गव्हर्निंग आणि कॉम्पॅक्ट व्ही-ट्विन 2-सिलिंडर इंजिन आहे. यामुळे कमी उत्सर्जन, आवाज न होता होणारे काम, उच्च पॉवर डेन्सिटी आणि वजनाने हलके तसेच जागा वाचवणारे डिझाइन आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील विविध गरजांसाठी म्हणजे मायक्रोग्रिड्स, शैक्षणिक संस्था, रिटेल तसेच औद्योगिक वापरासाठी हा जनसेट एक उत्तम पर्याय ठरतो.

 

या धोरणात्मक भागीदारीतून कूपर कॉर्पोरेशन हा जनसेट महाराष्ट्रातील सातारा येथील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पात तयार करणार आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये डायमॉन जनसेटचे संयुक्तपणे मार्केटिंग व वितरण दोन्ही भागीदारांकडून करण्यात येईल. यात आशिया, आफ्रिका आणि आखाती देशांकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. अभियांत्रिकी क्षेत्रातील शंभरहून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या सिन्फोनिया टेक्नॉलॉजीकडे पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधील सखोल तांत्रिक जाण आणि जागतिक बाजारपेठांचा उत्तम ॲक्सेस आहे. यामुळे या भागीदारीला अधिक बळ मिळत असून, वेगाने विकसित होत असलेल्या शाश्वत भविष्यासाठी आवश्यक असलेले जागतिक दर्जाचे स्वच्छ ऊर्जा उपाय सादर करण्याची क्षमता अधिक सक्षम झा

ली आहे.

***

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments