Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedअपने अपने राम' तीन दिवसीय कार्यक्रमातून उलगडणार 'अनोखी रामकथा' प्रख्यात कवी...

अपने अपने राम’ तीन दिवसीय कार्यक्रमातून उलगडणार ‘अनोखी रामकथा’ प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास करणार मार्गदर्शन ; पुणे जिल्हा अग्रवाल समाजाचा युवकांना धर्माशी जोडण्याचा प्रयत्न ; दिनांक १५ ते १७ डिसेंबर दरम्यान आयोजन

पुणे : श्रीराम कथा आणि वर्तमानात प्रभू श्रीरामांच्या जीवनातील मूल्यांचे महत्व अत्यंत सोप्या शब्दात मांडत तरुणाईला धर्माशी जोडण्याचा प्रयत्न ‘अपने अपने राम’ या तीनदिवसीय कार्यक्रमातून पुण्यात होणार आहे. पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे दिनांक १५ ते १७ डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत आरटीओ जवळील एसएसपीएमएस च्या मैदानावर होणा-या कार्यक्रमात प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

अयोध्येमध्ये जानेवारी २०२४ मध्ये पूर्णत्वास येत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर स्थापनेच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. कुमार विश्वास यांचा ‘अपने अपने राम’ हा कार्यक्रम जगप्रसिद्ध असून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर आधारित आहे. यातील दैनंदिन आयुष्यात माणसाला उपयुक्त अशा चांगल्या गोष्टी सहज सोप्या शब्दात डॉ. विश्वास उपस्थितांसमोर उलगडणार आहेत. या संगीतमय राम ऊर्जा सत्राकरिता पुणे, पिंपरी-चिंचवड सह जिल्ह्यातून ५ हजार हून अधिक समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमामध्ये कथेच्या माध्यमातून तणावमुक्तीच्या उपाययोजनांसह एकसंध समाज आणि उत्तम नागरिक घडविता येईल, याविषयी देखील संवाद होणार आहे. तसेच माणसाच्या जीवनात संस्कारांचे असलेले महत्व देखील मांडण्यात येणार आहे. तीन दिवसीय कथेत डॉ. कुमार विश्वास यांच्यासोबत त्यांचे २४ सहकारी देखील सहभागी होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments