Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेके केअर हॉस्पिटल (केकेसीएच) तर्फे गुडघे व मणकेदुखी तपासणी शिबीर

केके केअर हॉस्पिटल (केकेसीएच) तर्फे गुडघे व मणकेदुखी तपासणी शिबीर

पुणे, 12 ऑगस्ट २०२५ : केके केअर हॉस्पिटल तर्फे शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी गुडघे व मणकेदुखी तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दुपारी १२ ते ४ या वेळेत केके केअर हॉस्पिटल,चऱ्होली येथे होणार आहे.पाठदुखी,मान दुखी,गुडघे दुखी,संधिवात, स्पोर्टस इंज्युरी,मेनिस्कल टिअर,लिगामेंट इंज्युरी,ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या असणाऱ्या व्यक्तींनी या शिबिरात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

या शिबिरामध्ये वेदना तज्ज्ञ व फिजिओथेरपिस्ट यांच्याकडून मोफत सल्ला ,मोफत एक्स-रे किंवा यूएसजी तपासणी (आवश्यकतेनुसार),मोफत फिजिओथेरपी सेशन (तपासणीनुसार) तसेच रक्त तपासणी व उपचारांवर सवलत मिळणार आहे. शिबिरात सहभागी होण्याकरिता नोंदणी मोफत पण अनिवार्य आहे. नोंदणीसाठी 8550996969/9657139657 या क्रमांकावर संपर्क करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments