Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedपं. राजेंद्र कंदलगांवकर यांचे* *दि. १७ ऑगस्ट रोजी गुरुपूजन व गुरुवंदना कार्यक्रम*

पं. राजेंद्र कंदलगांवकर यांचे* *दि. १७ ऑगस्ट रोजी गुरुपूजन व गुरुवंदना कार्यक्रम*

वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून संगीताची साधना सुरू करणारे, आकाशवाणीचे टॉप ग्रेड कलाकार, संगीत अलंकार आणि “सूरमणी” पुरस्काराने सन्मानित पं. राजेंद्र कंदलगांवकर यांच्या गौरवासाठी त्यांच्या शिष्य परिवाराकडून “गुरुवंदना” हा विशेष कार्यक्रम रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी, दुपारी ३.०० वाजता, सवाई गंधर्व स्मारक, राहुल थिएटर जवळ, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

ग्वाल्हेर घराण्याचे शिक्षण गुरू पं. विष्णु ए. घाग यांच्याकडून, तसेच किराना घराण्याचे शिक्षण भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडून घेतलेल्या पं. कंदलगांवकर यांनी देश-विदेशातील अनेक प्रतिष्ठित मैफिलींत आपले गायन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.

या पार्श्वभूमीवर, “ईश्वराचे सगुण रूप म्हणजे गुरू आणि गुरूचे निर्गुण रूप म्हणजे ईश्वर” या भावनेने शिष्यवर्ग आपल्या गुरूंच्या चरणी गायनवंदना अर्पण करणार आहे. कार्यक्रमाचा समारोप गुरूगायनाने होणार असून, गुरूंच्या आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी रसिकांनी उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांना निःशुल्क आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments