पिंपरी, दि.१३ ऑगस्ट २०२५ – संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते, मराठी साहित्य, पत्रकारिता, रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथील आचार्य केशव अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास उप आयुक्त आण्णा बोदडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,आचार्य अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक संतोष कोराड तसेच उमेश बांदल,प्रशांत यादव तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
प्रल्हाद केशव अत्रे हे उत्तुंग व्यासंगी, उत्तम पत्रकार,अप्रतिम विनोदी लेखक आणि प्रभावी वक्ते होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते होते. साहित्य, पत्रकारिता आणि समाजप्रबोधन या तिन्ही क्षेत्रांत त्यांचे योगदान अभूतपूर्व असून त्यांची लेखणी आणि विचार आजही नव्या पिढीला प्रेरणा देतात.


