बेंगळुरू, XX ऑगस्ट २०२५: ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाशी बांधील राहत आणि सर्वोत्तम कार वितरित करण्यावर लक्ष केंद्रित करत टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आज आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही ‘अर्बन क्रूझर टायसर’मध्ये दोन प्रमुख सुधारणांची घोषणा केली. सर्व व्हेरिएण्ट्समध्ये नवीन ब्ल्यूइश ब्लॅक एक्स्टीरिअर रंग आणि प्रमाणित सहा एअरबॅग्जची भर करण्यात आली आहे.
आकर्षक नवीन लूक: सादर आहे ब्ल्यूइश ब्लॅक रंग
टायसरच्या गतीशील व उत्साही अपीलमध्ये भर करत टीकेएमने नवीन ‘ब्ल्यूइश ब्लॅक’ एक्स्टीरिअर रंग सादर केला आहे, जो आता निवडक व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. हा आकर्षक रंग एसयूव्हीची रस्त्यावरील उपस्थिती अधिक लक्षवेधक करतो, ग्राहकांना उत्साहवर्धक निवड देतो, ज्यामध्ये आकर्षकता व स्पोर्टी क्षमतेचे संयोजन आहे. या नवीन रंगामधून निदर्शनास येते की, टोयोटाला कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदीदारांची सर्वसमावेशक जीवनशैली पसंती आणि वैयक्तिकरणासाठी वाढती मागणी माहित आहे.
अधिक सुरक्षितता: प्रत्येक व्हेरिएण्टमध्ये प्रमाणित म्हणून ६ एअरबँग्ज
या नवीन अपग्रेडसह अर्बन क्रूझर टायसरच्या सर्व व्हेरिएण्ट्समध्ये आता प्रमाणित म्हणून सहा एअरबॅग्ज आहेत, ज्या ड्रायव्हर व प्रवाशांना अधिक सुरक्षितता देतात. या अपडेटसह टीकेएमने ई, एस, एस+, जी आणि व्ही या सर्व व्हेरिएण्ट श्रेणीमध्ये सुरक्षितता वैशिष्ट्ये वाढवली आहेत, ज्यामधून प्रवाशांना परिपूर्ण सुरक्षिततेची खात्री मिळते.
नवीन प्रमाणित एअरबॅग सिस्टममध्ये ड्युअल फ्रण्ट एअरबॅग्ज, दोन साइड एअरबॅग्ज आणि दोन कर्टन एअरबॅग्ज आहेत, जे विविध ड्रायव्हिंग स्थितींमध्ये सर्वांगीण संरक्षण देतात. या पुढाकारामधून टोयोटाचे जागतिक सुरक्षितता तत्त्व दिसून येते, तसेच टीकेएम विशेषत: कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये सुरक्षित गतीशीलता पर्यायांसाठी ग्राहकांच्या सर्वसमावेशक अपेक्षांची पूर्तता करते.
अर्बन क्रूझर टायसर: साहसी प्रवासासाठी डिझाइन करण्यात आलेली, व्यावहारिकतेसाठी निर्माण करण्यात आलेली
टोयोटाच्या विश्वासार्हतेसह शहरी अत्याधुनिकतेचे संयोजन असलेली कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून लाँच करण्यात आलेली अर्बन क्रूझर टायसरमध्ये स्टाइल, कार्यक्षमता व तंत्रज्ञानाचे लक्षवेधक संयोजन आहे. दोन कार्यक्षम इंजिन पर्याय – १.२ लीटर के-सिरीज पेट्रोल आणि कार्यक्षम १.० लीटर टर्बो पेट्रोल असलेली ही वेईकल जवळपास २२.७९ किमी/लीटर अपवादात्मक मायलेज देते, तसेच ही वेईकल ५एमटी, ५एएमटी व ६एटी अशा विविध ट्रान्समिशन पर्यायांसह येते.
आजच्या गतीशील शहरी जीवनशैलीसाठी सुसज्ज टोयोटा अर्बन क्रूझर टायसरमध्ये आकर्षक डिझाइन, कनेक्टेड तंत्रज्ञान आणि दैनंदिन व्यावहारिकतेचे लक्षवेधक संयोजन आहे. एक्स्टीरिअरमध्ये स्लीक एलईडी हेडलॅम्प्स, ट्विन एलईडी डीआरएल आणि सिग्नचेर ट्रॅपेझॉइडल ग्रिलसह क्रोम अॅक्सेंट्स आहेत. इंटीरिअरमध्ये प्रीमियम ड्युअल-टोन केबिन, ६०:४० स्प्लिट रिअर सीट्स, रिअर एसी व्हेण्ट्स आणि टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टमसह वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅप्पल कारप्ले आहे. अधिक आरामदायीपणा व नियंत्रणासाठी टायसरमध्ये सोईस्कर वैशिष्ट्ये आहेत- जसे क्रूझ कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स (एटी), वायरलेस चार्जिंग आणि टोयोटा आय-कनेक्टसह स्मार्टवॉच व वॉइस असिस्टण्ट सुसंगतता. प्रत्येक ड्राइव्हमधून आरामदायी प्रवास व मन:शांती मिळण्यासाठी टायसरमध्ये प्रगत सुरक्षितता तंत्रज्ञान आहे, जसे वेईकल स्टेबिलिटी कंट्रोल (व्हीएससी), हिल होल्ड असिस्ट, आयएसओफिक्स (ISOFIX) चाइल्ड सीट माऊंट्स आणि आता सर्व व्हेरिएण्ट्समध्ये प्रमाणित म्हणून सहा एअरबॅग्ज.
टोयोटा अर्बन क्रूझर टायसर ३-वर्ष / १००,००० किमी वॉरंटीसह येते, जी जवळपास ५ वर्षे / २२०,००० किमीपर्यंत वाढवता येते, तसेच टोयोटाची हॉलमार्क एक्स्प्रेस मेन्टेनन्स सर्विस आणि २४x७ रोडसाइड असिस्टण्स आहे.
टोयोटा अर्बन क्रूझर अपवादात्मक मूल्य देते, जेथे या वेईकलची किंमत ७.७७ लाख रूपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.
ग्राहक जवळच्या टोयोटा डिलरशिपला भेट देऊ शकतात किंवा https://www.toyotabharat.com/# येथे ऑनलाइन बुकिंग करू शकतात.
टोयोटा अर्बन क्रूझर टायसर आता आकर्षक नवीन ब्ल्यूइश ब्लॅक रंगामध्ये उपलब्ध, सर्व व्हेरिएण्ट्समध्ये प्रमाणित म्हणून अधिक सुरक्षितता ~ नवीन सुधारणांमधून टीकेएम ग्राहकांचे अभिप्राय ऐकण्यासह त्यांच्या गरजांना प्रतिसाद देत असल्याचे दिसून येते ~
RELATED ARTICLES


