पुणे, ऑगस्ट १४, २०२५: फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनिअम तर्फे स्वातंत्र दिन सप्ताह निमित्त फॅन पार्कमध्ये भारतीय सैन्याच्या शौर्य, त्याग आणि सेवेचा सन्मान करण्यासाठी #सॅल्यूटिंग अवर सोल्जर्स या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम १५ ऑगस्ट पासून ते १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पुण्याच्या फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनिअम येथील फॅन पार्क मध्ये संपन्न होईल.
या उदघाटनप्रसंगी माजी विशेष सेना अधिकारी आणि शौर्य चक्र सन्मानित कर्नल कौशल कश्यप उपस्थित होते. यांसह माजी लष्कर अधिकारी (२१ पॅरा एसएफ) कर्नल मनदीप सिंग आणि कॅप्टन पूजा मेहरा देखील उपस्थित होते.
या कार्यक्रमात पुणे कॉन्टोन्मेंट मधील सुमारे ३० सैन्य परिवार आणि १०० हुन अधिक कॅडेट्स सहभागी होते ज्यामुळे देशभक्ती आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले. प्रसिद्ध कलाकार नारायण साहू यांच्या मुविंग सॅण्ड आर्ट कलाकृतीचे अनावरण या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, भारताच्या विविध भागांतील १० कुशल कलाकार एकत्र आले असून त्यांची चित्रे प्रदर्शित करत सशस्त्र दलाच्या शौर्य, त्याग आणि भावनेचा सन्मान केला. भारतीय सैनिकांचे चित्रण असलेली ही कलाकृती स्वातंत्र्य दिन सप्ताहाच्या शेवटपर्यंत फॅन पार्कमध्ये प्रदर्शित केला जाईल.
हा उपक्रम १५ ते १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत सुरू राहील, ज्यामध्ये दररोज संध्याकाळी सॅण्ड आर्ट आणि शास्त्रीय गायकांचे संगीतमय सादरीकरण होईल.


