16 ऑगस्ट 2025, पुणे : फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथे देशभक्तीच्या उत्साहाची अनोखी लहर उसळली होती. #CelebratingNationsPride या उपक्रमांतर्गत आयोजित ‘शेड्स ऑफ व्हॅलर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या लष्कराला मनःपूर्वक अभिवादन करण्यात आले. या सोहळ्यात अनेक मान्यवर, विद्यार्थी आणि रसिक एकत्र आले होते आणि त्यांनी भारतीयत्वाचा उत्सव साजरा केला. या निमित्ताने असा एक मंच तयार झाला जिथे कल्पकता व देशाबद्दलचा अभिमान यांची सांगड घातली गेली.
या प्रसंगी कलाकार आसावरी लिंगाडे यांनी साकारलेली नेत्रदीपक हायपर-रिअॅलिस्टिक रांगोळी आणि आर्ट प्लस कनेक्ट यांच्यातर्फे देशभक्तीने प्रेरित चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाला अर्पण केलेल्या या अभिवादनाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (पीव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी, माजी डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ) आणि भारताच्या पहिल्या महिला यूएव्ही ऑब्झर्व्हर पायलट मेजर प्राजक्ता देसाई या दोन मान्यवर संरक्षकांच्या हस्ते झाले. पाहुण्यांनी कलाकृतींच्या भव्यतेचा आणि सूक्ष्मतेचा आस्वाद घेताना भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्य आणि समर्पणाविषयी आपले मनोगत व्यक्त केले आणि यामुळेच त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला अधिक अर्थपूर्णता लाभली.
दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या नॉर्थ गेटवरील आगमनाने झाली. कॅडेट्सच्या औपचारिक मिरवणुकीसोबत ते चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी गेले आणि नंतर रांगोळी विभागात जाऊन उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिले. रिबीन कापून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ईऑन ज्ञानांकुर स्कूल, खराडी आणि द लिटल मिलेनियम स्कूलचे 100 हून अधिक विद्यार्थी तिरंगी फुगे आणि झेंडे हातात घेऊन उपस्थित होते.
या प्रसंगी मेजर प्राजक्ता देसाई म्हणाल्या, “भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाला अभिवादन करणारी इतकी भव्य कलाकृती पाहणे आणि फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथे होणाऱ्या या सोहळ्याचा भाग होणे, ही खरंच हृदयाला स्पर्श करणारी भावना आहे. ज्या मातृभूमीत मी जन्मले, तिची मी ऋणी आहे आणि प्रत्येक भारतीयाची या मातृभूमीप्रती जबाबदारी आहे, असा माझा ठाम विश्वास आहे. मी लष्कराची वर्दी घातलेली असो वा नसो प्रत्येक व्यक्ती चांगली नागरिक होऊन देशाची सेवा करू शकते. आणि जेव्हा आपण एखाद्या सैनिकाला भेटतो, तेव्हा त्यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. अशा सन्मानातून आणि जबाबदारीतूनच आपण ‘नवीन भारत’ घडवू शकतो.”
लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस म्हणाले, “पुणे हे नेहमीच परंपरा आणि अभिमान जपण्यात अग्रणी असलेले शहर राहिले आहे आणि फिनिक्स मार्केटसिटीने असा एक मंच निर्माण केला आहे, जिथे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक एकत्र येऊन देशभक्तीच्या भावनेचा उत्सव साजरा करू शकतात. या सोहळ्याचा भाग होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि असा अर्थपूर्ण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. देशाबद्दलचा अभिमान साजरा करण्याची ही परंपरा येथे असाच सुरू राहो, ज्यातून आपल्या प्रत्येकाला आपल्या शहरासाठी आणि देशासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळत राहील.”
या कार्यक्रमास उपस्थित असलेले भागीदार आणि पाहुणे असे दोघेही प्रभावित झाले होते. देशसेवेत योगदान दिलेल्या मान्यवरांकडून मुलांना गौरविण्याची आणि देशभक्तीच्या वातावरणात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल लिटल मिलेनियम एज्युकेशन प्रा. लि., पुणेचे रिजनल हेड मार्केटिंग यश शाह यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भविष्यात अशा आणखी सहकार्याची संधी मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ईऑन ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैली मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना पाहुण्यांशी संवादातून मिळालेल्या जीवनाविषयीच्या मौल्यवान शिकवण मिळाली आणि अनुभव समृद्ध करणारा व संस्मरणीय असल्याचे सांगितले. येथे नियमित येणाऱ्या ग्राहक मेघा शर्मा यांनी खरेदीसाठी आलेल्या भेटीत हा उत्सव “एक सुंदर सरप्राइझ” असल्याचे सांगत, कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक केले आणि फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथे आशयपूर्ण व सुसंगत कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याच्या बांधिलकीबद्दल प्रशंसा व्यक्त केली.
फिनिक्सचे [पुणे मॉल्स] सीनियर सेंटर डायरेक्टर अंशुमन भारद्वाज म्हणाले, “फिनिक्स मार्केटसिटी पुणेमध्ये आम्ही केवळ खरेदीपुरते मर्यादित न राहता, आपल्या समुदायाच्या मूल्यांशी घट्ट नाते जोडणारे अनुभव निर्माण करण्यावर विश्वास ठेवतो. ‘शेड्स ऑफ व्हॅलर’ हा आपल्या लष्कराचे शौर्य आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा प्रयत्न होता आणि पुढील पिढीने राष्ट्रनिर्मितीतील आपल्या भूमिकेचा अभिमान बाळगावा यासाठीची प्रेरणा होती. इतक्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करण्याचा आम्हाला सन्मान लाभला आणि या सोहळ्यातून आपल्या ग्राहकांना झालेला आनंद व अभिमान पाहून आम्हाला अत्यंत आनंद झाला.”
‘शेड्स ऑफ व्हॅलर’चा समारोप चिंतन आणि अभिमानाच्या भावनेने झाला, ज्यातून राष्ट्राला एकत्र बांधून ठेवणाऱ्या मूल्यांची आणि त्यांचे जतन व सन्मान करण्याच्या सामूहिक जबाबदारीची सर्वांना पुन्हा जाणीव करून देण्यात आली.
फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथे शेड्स ऑफ व्हॅलरच्या निमित्ताने साजरा झाला भारतीयत्वाचा सोहळा
RELATED ARTICLES


