Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedअ‍ॅप्टिवने भारतात सॉफ्टवेअर-डिफाइन्ड वाहन क्षेत्रातील नाविन्यतेस गती देण्यासाठी चेन्नईमध्ये नवे तांत्रिक केंद्र...

अ‍ॅप्टिवने भारतात सॉफ्टवेअर-डिफाइन्ड वाहन क्षेत्रातील नाविन्यतेस गती देण्यासाठी चेन्नईमध्ये नवे तांत्रिक केंद्र सुरू केले

भारत: 18 अगस्त, 2025 – अ‍ॅप्टिव पीएलसी, ही ही एक जागतिक तंत्रज्ञान कंपनी जी अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि अधिक कनेक्टेड भविष्य घडविण्यावर लक्ष केंद्रित करते, हिने चेन्नई, भारत येथे नवीन सॉफ्टवेअर, ॲडव्हान्स्ड सेफ्टी आणि युजर एक्सपिरियन्स तांत्रिक केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. ज्यामुळे भारतातील कंपनीच्या अभियांत्रिकी विस्ताराला एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

३४,००० चौ. फूटांहून अधिक क्षेत्रफळात पसरलेले हे नवे केंद्र २०२६ पर्यंत ५०० अभियंत्यांना पाठबळ देईल आणि यात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि सुरक्षा-महत्त्वाच्या प्रणालींमधील नाविन्याला गती देण्यासाठी प्रगत लॅब्स आणि चाचणी अधोसंरचना उपलब्ध आहे.

या केंद्राचे उद्घाटन अ‍ॅप्टिव आणि महिंद्राचे वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते झाले. यात अ‍ॅप्टिव येथील सॉफ्टवेअर, अॅडव्हान्स्ड सेफ्टी अँड युजर एक्सपिरीयन्स चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि अध्यक्ष जावेद खान, महिंद्र अँड महिंद्र लिमिटेडचे ऑटोमोटिव्ह बिझनेस (नियुक्त) अध्यक्ष आर. वेलुसामी, एम.डी., महिंद्र इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेड, ग्रुप एक्झिक्युटिव्ह बोर्डचे सदस्य, महिंद्र अँड महिंद्र लिमिटेड यांचा समावेश होता.

जावेद खान म्हणाले, “भारतात आमचे अस्तित्व वाढवत असताना चेन्नईतील आमच्या नव्या तांत्रिक केंद्राच्या उद्घाटनाचा आम्हाला अभिमान आहे. हे केंद्र भारतासाठी स्थानिक पातळीवर एआय/एमएल आधारित एडीएएस आणि प्रगत अंतर्गत सेन्सिंग तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आमच्या क्षमतेस बळकटी देईल. हे भारतातील अभियांत्रिकी कौशल्यांवरील आमचा विश्वास दर्शवते आणि आम्हाला आमच्या ग्राहकांजवळ घेऊन येते, जेणेकरून आपण सर्व मिळून भारतात अधिक सुरक्षित आणि अधिक स्मार्ट भविष्य घडवू शकू.”

हे अ‍ॅप्टिवचे भारतातील चौथे तांत्रिक केंद्र असून, स्थानिक ओईएमच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनीच्या अभियांत्रिकी उपस्थितीला बळकटी देते. हे केंद्र नेक्स्ट-जेन एडीएएस पर्सेप्शन टूल्स, इन-कॅबिन सेन्सिंग तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर-डिफाइन्ड इन्फोटेन्मेंट प्लॅटफॉर्म्सच्या विकासाचे नेतृत्व करेल. तसेच, हे अ‍ॅप्टिवच्या क्लाउड-नेटिव्ह आर्किटेक्चरला हातभार लावेल, आणि विंड रिव्हरकडून मिळालेल्या हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि एज तंत्रज्ञानातील एकात्मिक क्षमता वापरेल. जागतिक प्रमाण आणि स्थानिक महत्त्व यांची सांगड घालून, हे केंद्र या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेसाठी परिणामकारक व ग्राहक-केंद्रित उपाय देण्यासाठी सक्षम ठरेल.

भारतात अ‍ॅप्टिवचे नाविन्य आणि उत्पादन इकोसिस्टम मजबूत करणे

स्थानिक वाहननिर्मात्यांसाठी अनुकूल प्रगत तांत्रिक उपायांच्या विकास, स्थानिकीकरण आणि उत्पादनास गती देण्यासाठी अ‍ॅप्टिव भारतातील आपल्या ॲडव्हान्स्ड सेफ्टी अँड युजर एक्सपिरियन्स ऑपरेशन्समध्ये सातत्याने गुंतवणूक करत आहे. आज अ‍ॅप्टिव भारतभरात १३,००० हून अधिक लोकांना रोजगार देते, आठ उत्पादन प्रकल्प, चार तांत्रिक केंद्रे आणि एक टूलिंग सेंटर चालवित, ज्यांचा कंपनीच्या जागतिक ध्येयपूर्तीत महत्त्वपूर्ण सहभाग आहे, म्हणजेच विविध उद्योगांसाठी बुद्धिमान, सॉफ्टवेअर-डिफाइन्ड प्रणाली सक्षम करणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments