Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणेस्थित स्टार्टअपला मारूती सुझुकीच्या ॲक्सलरेटर प्रोग्राममध्ये यश

पुणेस्थित स्टार्टअपला मारूती सुझुकीच्या ॲक्सलरेटर प्रोग्राममध्ये यश

पुणे,19 ऑगस्ट 2025 : पुण्याच्या डीप टेक इकोसिस्टिम मध्ये महत्त्वाची कामगिरी करत अदग्राड या स्टार्टअपची मारूती सुझूकीच्या प्रमुख ॲक्सलरेटर प्रोग्रामच्या नवव्या गटात फक्त पाच भारतीय विजेत्यांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे भारतातील ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानासाठी एक आघाडीचे नवोन्मेष केंद्र म्हणून पुण्याचे स्थान अधिक बळकट होते.

स्टेलरव्हिव्यूची मूळ कंपनी असलेल्या एडाग्रॅड ने महाअंतिम फेरीत 18 स्टार्टअप्सशी स्पर्धा करून इतर विजेत्यांसह आपले स्थान निश्चित केले. यावर्षीचा गट म्हणजे ऐतिहासिक टप्पा आहे,कारण मारूती सुझूकीने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्स साठी हा मंच खुला केला असून जागतिक स्टार्टअप श्रेणीसह जगभरातील सहभागींना आकर्षित केले.

स्टेलरव्हिव्यू बाय एडाग्रॅडचे संचालक निरंजन पाटील म्हणाले की,भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील आघाडीची कंपनी मारूती सुझुकी कडून मान्यता मिळणे हे अद्ययावत कॉम्प्युटर व्हिजन तंत्रज्ञानाद्वारे कामकाजात परिवर्तन घडवून आणण्याच्या आमच्या दृष्टीकोनाला पुष्टी देते. आमचे सर्व्हट्रॅक सोल्युशन ओईएम सेवा वर्कशॉप्सना भेडसावणाऱ्या व्हेईकल ट्रॅकिंग आव्हानांवर उपाय देत उत्पादकता वाढवते व ग्राहकानुभव अधिक सुधारते. ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सेंटर्सच्या कार्यपद्धतीत क्रांती घडवून आणण्यासाठी, सर्व्हट्रॅक सोल्यूशन एडाग्रॅडचे सिद्ध कौशल्याचा वापर करते, जे जागतिक स्तरावर २५,००० हून अधिक कॅमेरे तैनात करण्यावर आधारित आहे.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मारूती सुझुकी बरोबर एडाग्रॅड हे प्रुफ ऑफ कॉन्सेप्ट (पीओसी) च्या माध्यमातून कंपनीच्या टीम्सबरोबर काम करत वास्तविक परिस्थितीत त्यांच्या सोल्युशन्सची चाचणी घेतील. हे सहकार्य म्हणजे मेक इन इंडिया ध्येयाची सुसंगत ऑटोमोटिव्ह नवोपक्रमांना चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी दर्शविते.

पुण्यातील भरभराटीच्या स्टार्टअप इकोसिस्टिमसाठी एडाग्रॅडची कामगिरी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान उपाय प्रदान करण्याची शहराची क्षमता दर्शविते,जी जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकेल व भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील परिवर्तनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments