Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedजगप्रसिध्द कवी अर्न्स्ट यांडल यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पुण्यात विशेष प्रदर्शनाचे आयोजन

जगप्रसिध्द कवी अर्न्स्ट यांडल यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त पुण्यात विशेष प्रदर्शनाचे आयोजन

पुणे,19 ऑगस्ट 2025 : ग्योथं- इन्स्टिट्युट मॅक्स म्युलर भवन पुणे ने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या सहयोगाने जगप्रसिध्द कवी अर्न्स्ट यांडल यांच्या 100 व्या जयंती वर्षानिमित्त त्यांचे जीवन आणि यशस्वी कारकीर्द साजरी करण्यासाठी एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन 22 ऑगस्ट 2025 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 7 दरम्यान कर्वे रोड,एरंडवणे येथील पांडुंरंग कॉलनी येथील द बॉक्स स्टुडिओ येथे सुरू असणार आहे. ऑस्ट्रिया येथील लिटरेचर अर्काईव्ह व्हिएन्नाचे संचालक डॉ.बर्नहार्ड फेट्झ यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

अर्न्स्ट यांडल हे ऑस्ट्रियन लेखक होते व जर्मन भाषिक जगातील काव्य चळवळीतील आघाडीचे नाव आहे.त्यांच्या प्रायोगिक कवितांसाठी ते ओळखले जायचे. त्यांच्या कविता लिहिण्याची शैली अशी होती की,भाषा हाच उद्देश व काव्याचा विषय होता,दृश्य काव्य ज्यामध्ये आशयाचे प्रतिनिधित्व करणारे दृश्य हे केंद्रस्थानी होते,ध्वनी स्वरूपातील कविता ज्या केवळ आपण बोलल्यानंतरच उलगडतात. त्यांच्या काव्यामध्ये अशी जादू आणि विविधता आहे. पुण्यातील लोकांसाठी हे प्रदर्शन बहुसंवेदी स्वरूपात (मल्टीसेंसरी फॉरमॅट) आणि जर्मन व्यतिरिक्त इंग्रजी व मराठीत प्रदर्शित करण्यात आले आहे.

ग्योथं- इन्स्टिट्युट मॅक्स म्युलर भवनच्या भाषा विभागाच्या प्रमुख आणि उपसंचालिका आलिसिया पाद्रोस म्हणाल्या की, हे प्रदर्शन यांडल यांच्या ध्वनी,रचना आणि जागेचा अभूतपूर्व वापर हा त्रिमितीय इन्स्टॉलेशन्स, साऊंडस्केप्स,व्हिज्युअल प्रोजेक्शन्स अशा मनोरंजक मिश्रणाद्वारे लोकांसमोर आणले जाईल. जर्मन भाषेला परदेशी भाषा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आणि जर्मन भाषिक देशांच्या संस्कृतीला नाविन्यपूर्ण आणि आकर्षक मार्गांनी लोकांसमोर आणण्याच्या ग्योथं- इन्स्टिट्युट प्रयत्नांचा एक भाग आहे.

नागरिकांना अर्न्स्ट यांडल यांची कल्पकता,सर्जनशीलता पाहण्याची,ऐकण्याची आणि अनुभवण्याची ही एक संधी आहे.त्यांच्या कविता या पारंपरिक वाचनाला आव्हान देतात आणि प्रेक्षकांना भाषेचा स्तरीत,बहुसंवेदी अनुभव प्रदान करतात.

डॉ.बर्नहार्ड फेट्झ हे अर्न्स्ट यांडल या विषयावर दोन कार्यशाळा घेणार असून त्यातील एक शिक्षकांसाठी तर एक विद्यार्थ्यांसाठी असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments