Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedइव्हियम स्मार्ट मोबिलिटी’ आणि ‘सनएज’ एकत्र पुण्यात १५० ईव्ही स्कूटरचे वितरण;...

इव्हियम स्मार्ट मोबिलिटी’ आणि ‘सनएज’ एकत्र पुण्यात १५० ईव्ही स्कूटरचे वितरण; वर्षात दहा हजार ईव्ही स्कूटर विक्रीचे लक्ष्य

पुणे : इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन्समध्ये आघाडीवर असलेल्या ‘इव्हियम स्मार्ट मोबिलिटी’ आणि ‘सनएज’ पुण्यातील बालेवाडी येथील ‘द ऑर्किड हॉटेल’मध्ये आयोजित सोहळ्यात १५० इलेक्ट्रिक स्कूटरच्या वितरणाची घोषणा केली.

कार्यक्रमाला छगन राठोड (सीएमडी, सनएज), समीर मोईदीन (संस्थापक व सीईओ, इव्हियम स्मार्ट मोबिलिटी) आणि डॉ. अशोक तोडमल (लाइफ आणि बिझनेस कोच) उपस्थित होते. या धोरणात्मक भागीदारीद्वारे ‘इव्हियम’च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला ‘सनएज’च्या ताकदवान मार्केट नेटवर्कची जोड मिळणार आहे.

‘हा टप्पा आमच्या नवकल्पना, डिझाइन आणि शाश्वततेच्या माध्यमातून वाहतुकीत परिवर्तन घडवून आणण्याच्या दृषिटीकोनाचा पुरावा आहे. १५० वाहनांचे वितरण ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही, तर पर्यावरणात सकारात्मक बदल घडवून स्वच्छ आणि हिरवागार भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सनएजसोबत भागीदारी करून अधिकाधिक रायडर्सना इलेक्ट्रिक मोबिलिटी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे,’ असे संस्थापक व सीईओ, इव्हियम स्मार्ट मोबिलिटी समीर मोईदीन यांनी नमूद केले.

‘आजचा दिवस शाश्वत भारताकडे टाकलेले एक धाडसी पाऊल आहे. इलेक्ट्रिक वाहने केवळ ट्रेंड नसून, वाहतुकीचे भविष्य आहे. म्हणूनच इव्हियम स्मार्ट मोबिलिटीसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. ही फक्त व्यावसायिक भागीदारी नाही, तर आपल्या पर्यावरणाचे, देशाचे आणि येणाऱ्या पिढ्यांचे रक्षण करण्याची शपथ आहे,’ अशी भावना सीएमडी, सनएज छगन राठोड यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments