Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्हील ऑफ होप: ओएसिस फर्टिलिटी कडून स्वप्नांना प्रत्यक्षात आणणारी संधी

व्हील ऑफ होप: ओएसिस फर्टिलिटी कडून स्वप्नांना प्रत्यक्षात आणणारी संधी

पूणे, १0 ऑगस्ट 2025: “I Value Family for India’s Vibrant Future” या मोहिमेअंतर्गत, ओएसिस फर्टिलिटीने भारतातील सर्व केंद्रांमध्ये व्हील ऑफ होप या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक जोडप्यांमध्ये पालकत्वाची आशा जागवली. हा उपक्रम अनेक जोडप्यांचे पालक होण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतो.

या उपक्रमात 600 हून अधिक जोडप्यांनी सहभाग घेतला आणि त्याचा लाभ मिळवला. सर्व केंद्रांमध्ये सरप्राईज गिफ्ट्ससह एक स्पिन व्हील बसविण्यात आले होते. केंद्रांना भेट देणाऱ्या जोडप्यांना ‘व्हील ऑफ होप’ स्पिन अँड विन मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक जोडप्यांच्या मनात आशा आणि आत्मविश्वास निर्माण झाला.

या महिन्यात, 600 जोडप्यांना एकूण ₹41 लाखांहून अधिक सवलती देण्यात आल्या, तसेच पुणे, नाशिक, बेंगळुरू, ओडिशा आणि हैदराबाद येथील 11 जोडप्यांनी मोफत IVF उपचार जिंकले— ज्यामुळे ते पालक होण्याच्या त्यांच्या स्वप्नाच्या अधिक जवळ आले. अत्याधुनिक विज्ञानावर आधारित उपचार आणि संवेदनशील देखभाल यांचा संगम साधणाऱ्या ओएसिस फर्टिलिटीवर कुटुंबांचा असलेला विश्वास अशा उपक्रमांमधून अधोरेखित होतो आणि पालकत्वाच्या प्रवासात विश्वासू भागीदार म्हणून आमची भूमिका अधिक दृढ होते.

व्हील ऑफ होप बद्दल बोलताना ओएसिस फर्टिलिटीचे रेजनल मेडिकल हेड डॉ. निलेश उन्मेष बलकवडे म्हणाले,

“हा उपक्रम म्हणजे पालकत्वाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमचे छोटेसे पाऊल आहे आणि भारतासाठी एक सशक्त पिढी घडविण्याची आमची बांधिलकी आहे. हा उपक्रम आमच्या सहानुभूती, उत्कृष्टता आणि सबलीकरण या मूलभूत मूल्यांना पुन्हा अधोरेखित करतो.”

व्हील ऑफ होप उपक्रम सध्या आमच्या सर्व केंद्रांमध्ये सुरू असून, पालकत्व सर्वांसाठी उपलब्ध आणि समावेशक करण्याच्या आमच्या ध्येयाला बळकटी देतो. यात महिलांना मोफत IVF उपचार पासून ₹10,000 ते ₹1,00,000 पर्यंतच्या आकर्षक सवलती जिंकण्याची संधी मिळते.

या उपक्रमाद्वारे, ओएसिस फर्टिलिटी विज्ञानावर आधारित आणि विश्वासार्ह फलप्राप्ती भागीदार म्हणून आपली ओळख अधोरेखित करते. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाबरोबरच होणारया पालकाच्या प्रवासाला समर्थतेची ताकत सबळतेचा आधार आणि आशावादाचा प्रकाश देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments