Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorized३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘किचन क्वीन’ पाककला स्पर्धा

३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘किचन क्वीन’ पाककला स्पर्धा

३७व्या पुणे फेस्टिव्हलअंतर्गत महिलांसाठी खास ‘किचन क्वीन’ पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बुधवार, दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते सायं ५ या वेळेत डेक्कन कॉर्नर येथील सावरकर स्मारक सभागृहात पार पडणार आहे, अशी माहिती पाककला स्पर्धेच्या समन्वयक करुणा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अ‍ॅड. अभय छाजेड, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई व माजी नगरसेवक अविनाश बागवे उपस्थित होते.

 

 

 

यंदाच्या स्पर्धेसाठी ‘पौष्टिक टिफिन’ हा विषय असून स्पर्धकांना दुपारी १२ ते १.३० या वेळेत आपले पदार्थ मांडावे लागतील. महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजनही करण्यात आले आहे.

 

 

 

स्पर्धेचा बक्षीस समारंभ त्याच दिवशी सायं. ४ वाजता होणार असून, पाककला कौशल्य दाखवण्याची ही सुवर्णसंधी चुकवू नये, असे आयोजकांनी सांगितले.

 

 

 

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २९ ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली असून

 

९८६०४०२७८० कृपया या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन संयोजिका करुणा पाटील यांनी केले आहे.

 

 

 

करुणा पाटील, संयोजिका – ९८६०४०२७८०

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments