Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedपथनाट्य, लोकगीत गायन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेने रंगली प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक...

पथनाट्य, लोकगीत गायन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेने रंगली प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक स्पर्धा*  प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने आयोजन

 

पुणे : मतदान माझा हक्क आणि कर्तव्य… या विषयावर पथनाटयाद्वारे मतदान, लोकशाहीचे महत्व अधोरेखित करीत विद्यार्थ्यांनी सशक्त भारताचा संदेश दिला. तर, भारुड, भजन व पोवाडा यांसारख्या लोकगीत गायनातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासोबतच आणीबाणी योग्य की अयोग्य तसेच धार्मिक कट्टरता आणि पेहेलगाम यांसारख्या ज्वलंत विषयांवर वादविवाद स्पर्धेतून भाष्यही केले.

 

निमित्त होते, प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, सृजनसभा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ व्या प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे. न-हे मानाजीनगर येथील संस्थेच्या संकुलात आयोजित स्पर्धेला संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, होनराज मावळे यांसह विविध क्षेत्रातील अभ्यासू परीक्षक उपस्थित होते.

 

वक्तृत्व, लोकगीत गायन, वादविवाद, पथनाटय, छोटा ख्याल गायन, नाटयगीत गायन व एकल तबला वादन या प्रकारांत ही तीन दिवसीय स्पर्धा घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धेसाठी भारत विश्वगुरु होणार, वंदे मातरम् राष्ट्रीय गीत, तिसरे महायुद्ध? असे विषय होते. याशिवाय यंदा प्रथमच छोटा ख्याल गायन, नाटयगीत गायन व एकल तबला वादन स्पर्धा देखील उत्साहात पार पडली. तसेच स्व. आमदार रमेशभाऊ वांजळे निबंधलेखन स्पर्धा व कै. उद्धवराव तुळशीराम जाधवर वक्तृत्व स्पर्धा ही १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आली होती.

 

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, युवा पिढीतील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरीता दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये पुण्यासह कोल्हापूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी शहरांतील संघांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धा प्रकारांतील प्रथम विज्येत्याला १५ हजार ५५५ रुपये, द्वितीय क्रमांकाला ११ हजार १११ रुपये, तृतीय क्रमांकाला ७ हजार ७७७ रुपये व चषक आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविणा-या रुपये ११११ व चषक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दिनांक १३ सप्टेंबर रोजी महाविद्यालयात होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments