Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorized52 व्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न विद्यार्थीदशेपासूनच प्रत्येकाने...

52 व्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न विद्यार्थीदशेपासूनच प्रत्येकाने खेळ आत्मसात केल्यास भारत देश निरोगी युवकांचा देश बनेल.- अँड. दीपक सुळ

 

यजमान लातूरच्या वेदांतचे रौप्यपदक तर स्वप्निलने पटकावले कांस्य

आजचा दिवस गाजला स्वरूप, विराज, वेदांत, प्रतिक, ओंकार, अर्जुन, आर्यन, देव आणि कुश यांच्या बहारदार खेळाने.

 

कोणताही ऑलिम्पिक खेळप्रकार शिकल्यास शारीरिक आणि मानसिक कणखरता आपोआप येते त्याशिवाय अंगी शिस्त देखील बाणली जाते म्हणूनच खेळाचे बाळकडू बालपणापासूनच देशाच्या भावी नागरिकांना दिले गेल्यास आपला देश निरोगी आणि सुदृढ युवकांचा देश ओळखला जाईल असे प्रतिपादन अँड. दीपक सुळ यांनी केले. ते पुढे म्हणाले की युद्धकला क्रीडा प्रकारात अत्यंत शिस्त असते आणि त्यामुळे ज्यूदो खेळाचे खेळाडूना आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या मिलिटरी आणि पॅरा-मिलिटरी फोर्सेससह पोलीस दलामध्ये देखील सेवा करण्याची संधी मिळते. खेळ शिकल्याने आरोग्यासह उत्तम भविष्याची सुनिश्चिती होते म्हणूनच या देशातील प्रत्येक बालकाने कोणतातरी खेळ शिकलाच पाहिजे असे आग्रही प्रतिपादन सुळ यांनी केले.

 

बार्शी रोडवरील गिरवलकर मंगल कार्यालयामध्ये पुनित बालन गृप प्रस्तूत 52 व्या राज्यस्तरीय सबज्युनियर्स गटाच्या स्पर्धांचे आज उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे अध्यक्ष आणि लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक तर योगेश गिरवलकर, सिद्धेश्वर बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सुत्रसंचलन डॉ. अशोक वाघमारे तर प्रास्ताविक लातूर ज्यूदोचे अध्यक्ष डॉ प्रदीप देशमुख यांनी केले.

 

उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर राज्य ज्यूदो संघटनेचे महासचिव दत्ता आफळे, कोषाध्यक्ष रविंद्र मेटकर, उपाध्यक्ष डॉ गणेश शेटकर, सुरेश समेळ, मुकूंद डांगे, तिलक थापा, दिनेश बागूल, राज्य तांत्रिक समितीच्या अध्यक्षा कु. दर्शना लाखाणी, सचिव योगेश धाडवे, अतुल बामनोदकर, सचिन देवळे, निखील सुवर्णा, स्पर्धा संचालक योगेश शिंदे यांसह लातूर ज्यूदो संघटनेचे सचिव आशिष क्षिरसागर, डॉ संपत साळुंके, डॉ. अशोक वाघमारे यांची उपस्थिती होती. स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनतर्फ़े करण्यात आलेले असून त्यास द लातूर ज्यूदो संघटनेने सहकार्य केले आहे. 13 ते 15 वयोगटातील मुले आणि मुलींच्या स्पर्धेत 27 जिल्ह्यातील 334 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

दरम्यान उद्घाटन कार्यक्रमावेळी राज्याचा सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या ज्यूदो खेळातील शिव छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू यशवंत दांगट, प्रसाद मोकाशी, अतुल शेलार आणि तुषार मालोदे यांच्यासह नुकतीच आंतरराष्ट्रीयपंच परीक्षा उत्तीर्ण झालेले सुरेश कनोजिया यांचा सत्कार करण्यात आला.

आज दिवसभरात मुलांच्या सर्व म्हणजे नऊ गटातील स्पर्धा झाल्या. यातील यजमान प्रेक्षकांची वाहव्वा मिळवली ती पदक विजेत्या स्वप्निल आणि वेदांताच्या खेळीने. मुंबई बरोबर 60 किलोखालील लढतीत मुंबईच्या आर्यन खरे बरोबर झालेल्या लढतीत लातूरच्या वेदांत मुंडेनी आक्रमण करत चांगली खेळी केली पण त्याला सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नाही. राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघात स्वरूप, विराज, वेदांत, प्रतिक, ओंकार, अर्जुन, आर्यन, देव आणि कुश यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपली जागा निश्चित केली. मुलांच्या गटात मुंबईने दोन सुवर्ण पदक पटकावून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले तर द्वितीय क्रमांकावर ठाणे आणि कोल्हापूर तिसर्‍या क्रमांकावर राहिला.

30 किलोखालील मुले

सुवर्ण विराज तरवडे पीजेए

रौप्य शुभम भंडारी ठाणे

कांस्य यश पगारे धुळे

कांस्य अफान वर्षांनी यवतमाळ

35 किलोखालील मुले

सुवर्ण वेदांत परदाई यवतमाळ

रौप्य विराज भगत नाशिक

कांस्य अथर्व सानप अमरावती

कांस्य आयुष चौधरी क्रीडा प्रबोधिनी

40 किलोखालील मुले

सुवर्ण प्रतिक व्यवहारे क्रीडा प्रबोधिनी

रौप्य प्रज्वल यादव कोल्हापूर

कांस्य नक्षसिंग राजपूत सांगली

कांस्य समर्थ राऊत पीजेए

45 किलोखालील मुले

सुवर्ण ओंकार काकड छ. संभाजीनगर

रौप्य अर्जुन नरोडे क्रीडा प्रबोधिनी

कांस्य ओजस सुकळकर वर्धा

कांस्य विश्वजित घाडगे सांगली

50 किलोखालील मुले

सुवर्ण कुश पंडित ठाणे

रौप्य युवराज चौधरी नागपूर

कांस्य नीरज कांबळे सांगली

कांस्य अर्श बालापुरे यवतमाळ

 

55 किलोखालील मुले

सुवर्ण स्वरूप परदेसी कोल्हापूर

रौप्य भुविक पुजारी ठाणे

कांस्य श्रेयस दंडगव्हाळ छ. संभाजीनगर

कांस्य स्वप्निल सोनवणे लातूर

60 किलोखालील मुले

सुवर्ण आर्यन खरे मुंबई

रौप्य वेदांत मुंडे लातूर

कांस्य हर्षवर्धन पाटील कोल्हापूर

कांस्य उज्वल पहारे अहिल्यानगर

66 किलोखालील मुले

सुवर्ण अर्जुन चोडणकर मुंबई

रौप्य शौर्याजित माळी सांगली

कांस्य अथर्व मोरे पीजेए

कांस्य पार्थ साप्ते धाराशिव

66 किलोवरील मुले

सुवर्ण देव गौतम रायगड

रौप्य मनोज चौधरी पिडीजेए

कांस्य प्रतिक मदाने सोलापूर

कां

स्य तरणजीत सिंग अमरावती

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments