Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedमागासवर्गीय महामंडळाच्या थकीत कर्ज लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना

मागासवर्गीय महामंडळाच्या थकीत कर्ज लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना

पुणे दि.22 :- जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात लाभार्थीसाठी एकरकमी परतावा योजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांनी कळविले आहे.

 

या योजनेनुसार ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी परतावा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी भरणा परतावा OTS योजना 31 मार्च 2026 पर्यत राबविण्यात येणार आहे. तरी महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीना या योजनेचा फायदा घेऊन कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments