मुंबई, २६ ऑगस्ट २०२५: द बॉडी शॉप या ब्रिटीश-निर्मित ब्युटी ब्रँडने नॅशनल युथ डे (राष्ट्रीय युवा दिन) निमित्त आपल्या युथ कलेक्टिव्ह कौन्सिल २.० (वायसीसी २.०) सल्लागार मंडळाची घोषणा केली आहे, जे तरूणांच्या मतांना सक्षम करण्यासाठी आणि परिवर्तनाला चालना देण्यासाठी ब्रँडच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमधील महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वायसीसी १.० च्या यशाला अधिक पुढे घेऊन जात हे नवीन कौन्सिल विशेषत: शाश्वतता, सामाजिक प्रभाव व सर्वसमावेशकतेसह मुलभूत व्यवसाय निर्णयांमध्ये तरूणांचे मत समाविष्ट करण्याप्रती द बॉडी शॉपच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करते.
कौन्सिलमधील नवीन सदस्यांमध्ये पर्यावरणवादी, लेखक आणि ग्रीनर अर्थ फाउंडेशनचे संस्थापक ३० वर्षीय आकाश रॅनिसन, हवामान कार्यकर्ते, टेडएक्स स्पीकर आणि हरी कोशिशचे संस्थापक १७ वर्षीय नमन सोनपार, मानसिक आरोग्याच्या समर्थक आणि कवच अॅपच्या संस्थापिका १६ वर्षीय अनुष्का जॉली, हरित अर्थव्यवस्था उत्प्रेरक आणि द सॉफ्ट मूव्हमेंटच्या संस्थापिका २० वर्षीय द्विशोजोयी बॅनर्जी यांचा समावेश आहे.
प्रत्येक सदस्य द बॉडी शॉपच्या मुख्य मूल्यांशी आणि नैतिक मूल्यांशी सुसंगत असलेल्या शिफारसी सादर करतील, ज्यामुळे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, पर्यावरणीय समर्थनाला बळकटी देण्यासाठी, सार्वजनिक सहभाग वाढवण्यासाठी आणि हरित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आमची सहयोगात्मक कटिबद्धता अधिक दृढ होईल.
क्वेस्ट रिटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शंकर म्हणाले, “नाविन्यता, सर्वसमावशेकता व कृतीच्या माध्यमातून आमचा एकत्रित सर्वोत्तम, हरित विश्व निर्माण करण्याचा मनसुबा आहे, जेथे भारतातील तरूण आव्हानांना जाणून घेण्यासोबत त्यावर उपाय शोधून काढण्यामध्ये देखील अग्रस्थानी आहेत. वायसीसी २.० सह द बॉडी शॉप इंडिया नैतिक, शाश्वत व सर्वसमावेशक सौंदर्यामधील प्रमुख म्हणून आपला दर्जा अधिक दृढ करत आहे.”
कंपनीचे नेतृत्व तरूण परिवर्तनकर्त्यांसाठी अधिक वैविध्यपूर्ण व प्रतिसादात्मक करण्याच्या मिशनसह २०२३ मध्ये वायसीसी १.० ची स्थापना करण्यात आली. आपल्या कार्यकाळात पहिल्या कौन्सिलने अनेक प्रभावी उपक्रमांची शिफारस केली, ज्यात लिंग-समावेशक नियुक्ती व व्यवस्थापन पद्धती, ब्रँड कम्युनिकेशनमध्ये वास्तविक जीवनातील, विविध व्यक्तींचे प्रामाणिक प्रतिनिधीत्व आणि दृष्टिहीन ग्राहकांसाठी सुलभता सुधारण्यासाठी स्टोअरमध्ये ब्रेल लिपीची सुविधा यांचा समावेश आहे. हे उपक्रम २०२४-२०२५ मध्ये द बॉडी शॉप इंडियामध्ये यशस्वीरित्या अंमलात आणले गेले आहेत, ज्यामुळे उद्योगात विविधता आणि सुलभतेसाठी नवीन मापदंड स्थापित झाले आहेत.


