Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedबनावट सही व शिक्क्याच्या पत्रापासून नागरिकांनी सतर्क रहावे

बनावट सही व शिक्क्याच्या पत्रापासून नागरिकांनी सतर्क रहावे

पुणे, दि. 26 : पांढरेवाडी व जिरेगाव ता. दौंड जि. पुणे ही गावे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, फेज-2 झोन मध्ये समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव भूसंपादन अधिकारी क्र.03 पुणे यांच्या कार्यालयाकडून भूसंपादन अधिकारी क्र.03 यांची बनावट सही व कार्यालयाचा शिक्क्याचा वापर करुन कार्यालयाचा जा.क्र.उपजि/भूसं3/कावि/421/2025, दि. 20 जुलै 2025 रोजीचे निवेदन अशा आशयाचे पत्र मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ, मरोळ इंडल क्षेत्र, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-400093 यांना पाठविल्याचे पत्र सामाज माध्यमावरुन प्रसारीत होत आहे.

 

भूसंपादन अधिकारी क्र.03 पुणे यांच्या सही व शिक्क्याचे बनावट पत्र तयार करुन नागरीकांची दिशाभूल करीत आहेत. बनावट पत्राबाबत अज्ञाताविरुद्ध शासकीय कामात हस्तक्षेप, सही व शिक्क्याचा गैरवापर करुन नागरिकांमध्ये दिशाभूल करणारे वातावरण तयार करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करुन कायदेशी कारवाई करणेबाबत बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

 

तथाकथित निवेदन भूसंपादन क्र.03 कडून देण्यात आले नसून, ते पूर्णपणे खोडसाळ व बनावट असून, नागरीकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या पत्रापासून सतर्क रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.03 पुणेच्या डॉ. संगीता राजापूरकर-चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments