पुणे — दिनांक —29 ऑगस्ट 2025— पुणे शहर शिवसेनेच्या (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना ) सोशल मिडिया विभागाच्या पुणे शहर विभागाच्या प्रमुखपदी (अध्यक्षपदी )समीर अनिलकुमार नाईक यांची निवड करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा समन्वयक मंगेश साटमकर, पुणे महानगर प्रमुख व माजी आमदार रविंद्र धंगेकर, पुणे विभागाचे संपर्कप्रमुख अजय भोसले, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख महादेव सालवडे, पुणे जिल्हा सोशल मिडीया विभागाचे प्रमुख मंगेश शिसोदे, छत्रपती शिवाजीनगर विभागाचे प्रमुख सचिन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी समीर नाईक यांचे पुष्पगुछ देऊन अभिनंदन केले.
श्री समीर नाईक महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक व नागरिकांची कामे करत आहेत. तसेच शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघांचे संघटक म्हणून काम करीत आहेत. संघटनेतर्फे वाल्मिक कराड याच्यावर राज्य शासनाने कडक कारवाई करावी या मागणीसाठी आंदोलन केले. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी संघटनेतर्फे प्रयत्न केले. मतदारसंघातील नागरी सुविधाविषयक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मतदार संघातील पूरग्रस्तांना मदत केली


