Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय आयुक्त कार्यालयाच्या व्हॉट्सॲप चॅनेलचे उद्घाटन

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या व्हॉट्सॲप चॅनेलचे उद्घाटन

पुणे, दि. २९: विभागीय आयुक्त कार्यालयाच्या ‘डिव्हिजनल कमिशनर ऑफिस पुणे डिव्हिजन’ (divisional commissioner Office, Pune division) या व्हॉट्सॲप चॅनलचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 

 

 

यावेळी सामान्य प्रशासन अपर आयुक्त तुषार ठोंबरे, सह आयुक्त अरुण आनंदकर, विकास गजरे, संजीव पलांडे, सहायक आयुक्त किर्ती नलावडे आदी उपस्थित होते.

 

 

 

राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा कार्यालयीन सुधारणांचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये विविध घटक समाविष्ट असून ई- गव्हर्नन्स या महत्त्वाच्या घटकाचाही यात समावेश आहे. ई-गव्हर्नन्सच्या अनुषंगाने कार्यालयांतर्गत तसेच नागरिकांनाही विभागीय आयुक्त कार्यालयातून राबविण्यात येणाऱ्या योजना, त्यासाठी देण्यात येणारा निधी, विविध विषयांची माहिती आदी या व्हॉट्सॲप ग्रुपवर देण्यात येणार आहे.

 

 

 

विभागीय आयुक्तालयातील कामकाज अधिक गतीमान करणे, पारदर्शकतेच्या माध्यमातून जनमानसात प्रशासनाची विश्वासार्हता वाढविणे आदी बाबी या चॅनेलच्या माध्यमातून साध्य होणार आहेत.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments