Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजगुरुनगर येथील वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे

राजगुरुनगर येथील वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावे

पुणे, दि.२९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) :- सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात व्यवसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी बी.सी.ई.बी.सी मुलींचे शासकीय वसतीगृह राजगुरुनगर येथे प्रवेश घेण्याकरिता https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १५ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे.

 

 

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत वसतिगृहात इयत्ता 8 वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती, विमुक्त जमाती भटक्या जाती, विशेष मागासप्रवर्ग, दिव्यांग व अनाथ मुलींना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधीन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी बी.सी.ई.बी. सी. मुलींचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल पी.व्ही. आंबले- ७५०७५९०६४७ यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपालानी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments