आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय नामदार अण्णासाहेब हजारे यांची भेट घेऊन शेतकरी कष्टकरी व अण्णांनी मागणी केले प्रमाणे तयार झालेल्या दहा कायद्यांच्या संदर्भात चर्चा केली. कायद्याची अंमलबजावणी शासन स्तरावर कठोरपणे करावी या संदर्भात चर्चा केली तसेच शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या शेतमालाला c2-50, शेतातील कोथींबीरी पासून तर शेतात उगवणाऱ्या सर्व प्रकारच्या शेतमालाला गॅरंटी हमीभाव बेस रेट, गरजवंत खिचडा वर्ग शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री व देशाचे प्रधानमंत्री यांना पत्र व्यवहार करावा अशी चर्चा झाली त्यावर अण्णांनी सकारात्मक पत्र व्यवहार करण्याच्या संदर्भामध्ये चर्चेमध्ये सांगितलेले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू असलेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘शेतकरी शेतमजूर कष्टकरी हक्क समिती च्या आंदोलना संदर्भात सकारात्मक चर्चा झाली माननीय नामदार श्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी सकारात्मक भूमिका मान्य केलेली आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट होईल त्यावेळी शेतकरी कर्जमुक्ती व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्व प्रकारच्या शेतमाला लागतात बेस रेट एमएसपी कायद्याच्या संदर्भात चर्चा करील असे अण्णांनी सांगितले आहे.
तसेच संघटनेच्या वतीने सुरू केलेल्या महा ऍग्रो फार्मफुड सोलूशन फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संदर्भात चर्चा झाली कंपनीने तयार केलेल्या विविध ऑरगॅनिक पदार्थांच्या संदर्भात माहिती दिली शेतकऱ्यांच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कंपनीच्या उद्घाटनाला मी उपस्थित राहील असे आश्वासन अण्णांनी दिले आहे.
तसेच सोलापूर बीड अहमदनगर सातारा आणि सांगली या पाच जिल्ह्यांमध्ये चारा छावण्यांमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या चारा घोटाळा भ्रष्टाचार, प्रकरणी दोषी 1000 पेक्षा अधिक आरोपींवर फौजदारी गुन्हे दाखल झालेले असून त्या सर्व संबंधितांवर जिल्हाधिकारी कारवाई करण्यात नसल्याने त्या जिल्हाधिकाऱ्यांना सदर बाबत कठोर कारवाई करण्याच्या संदर्भात पाठपुराव्याचे पत्र कोर्टाचा निकाल तसेच शासनाचे दोन्ही आदेश देऊन पाचही जिल्ह्यातील कलेक्टर यांना पत्र व्यवहार करून कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे तसेच सदर प्रकरणी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र व्यवहार करावा अशी चर्चा झाली त्यावर अण्णांनी सकारात्मक स्टडी करून पत्रव्यवहार करतो असे मला सांगितले आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य सह संपूर्ण देशभरामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदार मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान द्यावे अशा प्रकारची चर्चा झाली यावेळी संघटनेच्या वतीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या संदर्भात राज्य व केंद्र सरकार सचित निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करण्याच्या संदर्भात देखील चर्चा झाली आहे,
माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्यावर यापुढे कोणीही व्यंगचित्राच्या माध्यमातून अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून विकृत चर्चा केल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सदर बाबतचा पत्रकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना केले असल्याची माहिती यावेळी अण्णांना विठ्ठल राजे पवार यांनी दिली आहे.
यापुढील सर्व प्रकारच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या संदर्भात संघटनेच्या माध्यमातून आंदोलन व पत्रव्यवहार करण्याची चर्चा यावेळी झाली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर तसेच सहाय्यक दत्ता आवारी अन्सार शेख, श्री सातकर व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कृपया सर्वांनी ही बातमी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी व शेतकऱ्यांनीच यापुढे आंदोलनात सहभागी व्हावे अशी सूचना या द्वारे मी करत आहे.
आपलाच बँकेत किसान सेवक.
विठ्ठल राजे पवार.
अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक शरद जोशी विचार मंच शेतकरी कामगार महासंघ संघटना नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य.


