Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिशन आर्थ्रायटिस इंडिया तर्फे नॅशनल पेशंट्स कंव्हेंशन’ (राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषद) संपन्न...

मिशन आर्थ्रायटिस इंडिया तर्फे नॅशनल पेशंट्स कंव्हेंशन’ (राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषद) संपन्न * संधिवात व्यवस्थापनासाठी समग्र दृष्टीकोन महत्त्वपूर्ण : तज्ञांचे मत

पुणे १९ फेब्रुवारी २०२४ : संधिवात व्यवस्थापनासाठी समग्र दृष्टीकोन महत्त्वाचा असल्याचे असे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले. संधिवात असलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी कार्यरत असलेल्या ’मिशन आर्थ्रायटिस इंडिया’ (माई) तर्फे नुकतेच पूना क्लब येथे नॅशनल पेशंटस् कंव्हेंशन (राष्ट्रीय संधिवात रुग्ण परिषद) चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, पुणेच्या क्लिनिकल इम्युनोलॉजी आणि ऱ्हुमेटोलॉजी विभागाच्या प्रमुख व प्राध्यापिका डॉ.कविता कृष्णा,यांसह सेंटर फॉर र्‍हुमॅटिक डिसिजेस् (सीआरडी) चे चीफ र्‍हुमॅटॉलॉजिस्ट आणि संचालक डॉ.अरविंद चोप्रा, माई च्या अध्यक्षा दीपा मेहता,उपाध्यक्षा डॉ. अनुराधा वेणूगोपालन,सचिव श्वेता कुलकर्णी , ‘माई’च्या विश्वस्त राणी पारसनीस व शरयू भट आणि फिजियोथेरेपिस्ट डॉ. निलिमा बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. आर्थ्रायटिस मॅनेजमेंट : एक्सप्लोरिंग द इम्पॅक्ट ऑफ वेदर, पोल्युशन,डाएट अँड ट्रॅडिशनल होम थेरपीज (हवामान आणि ऋतू बदल, प्रदूषण, आहार आणि पारंपारिक उपचार पद्धती यांचा संधिवातावर होणारा परिणाम आणि नियोजन) ही या परिषदेची संकल्पना होती. याप्रसंगी मिशन आर्थ्रायटिस इंडिया’ (माई) २०२४ च्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या परिषदेत मिशन आर्थ्रायटिस इंडिया (माई) च्या माजी अध्यक्षा श्रीमती शिवानी बर्वे यांना कै.श्री.पी.सी. नहार ’वक्तृत्व पुरस्कार,स्टँड फॉर एंकिलोझिंगचे जिमित ठक्कर यांना श्री. हरिभाऊ राठीजी वात विरुद्ध योद्धा पुरस्कार, तर सेंटर फॉर र्‍हुमॅटिक डिसिजेस् (सीआरडी) तर्फे वात विरुद्ध योद्धा पुरस्कार सुप्रिया शिंदे यांना प्रदान करण्यात आला.

योग आत्मसात करा आणि निरोगी व्हा बहुविध पध्दतींबाबत ’माई’च्या विश्वस्त राणी पारसनीस यांनी मार्गदर्शन केले.

संधिवात तज्ज्ञ डॉ. वैजयंती लागू – जोशी यांनी प्रदूषण, हवामान आणि ऋतूतील बदलाचा संधिवात रुग्णांवर होणार परिणाम, आहारतज्ञ आणि कन्सल्टिंग न्यूट्रीशनिस्ट डॉ. शिल्पा शिरोळे – खंडेलवाल यांनी संधिवात आणि आहार या विषयावर, संधिवात करीता पारंपारिक थेरपी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शिल्पा थोरात यांनी, नॉन ड्रग मॅनेजमेंट ऑफ ऱ्हुमेटोइड आर्थ्रायटिस या विषयावर सेंटर फॉर र्‍हुमॅटिक डिसिजेस् (सीआरडी) चे चीफ र्‍हुमॅटॉलॉजिस्ट आणि संचालक डॉ. अरविंद चोप्रा, व्यायामाचे प्रिस्क्रिप्शन – आम्हाला त्याची गरज आहे का? या विषयावर फिजियोथेरेपिस्ट डॉ. निलिमा बेडेकर यांनी या विषयांवर सर्वाना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी कार्यक्रमात अबोली बुरांडे यांनी कवितावाचन केले. यावेळी माई दरबार या कार्यक्रमात मिशन आर्थ्रायटिस इंडिया’ (माई) च्या सदस्यांशी संवाद साधण्यात आला. ज्योती पाटील आणि टीम ने भजन सादर केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबोली बुरांडे आणि मिशन आर्थ्रायटिस इंडिया (माई) च्या उपाध्यक्षा डॉ. अनुराधा वेणूगोपालन यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments