Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून भारतात गॅलॅक्‍सी टॅब ॲक्टिव्ह ५ लाँच: उद्योगामधील कर्मचारीवर्गासाठी डिझाइन करण्‍यात आलेला...

सॅमसंगकडून भारतात गॅलॅक्‍सी टॅब ॲक्टिव्ह ५ लाँच: उद्योगामधील कर्मचारीवर्गासाठी डिझाइन करण्‍यात आलेला शक्तिशाली, ५जी-सक्षम टॅब्‍लेट

गुरूग्राम, भारत – ऑगस्‍ट १८, २०२५ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतात गॅलॅक्‍सी टॅब ॲक्टिव्ह ५ एंटरप्राइज एडिशनच्‍या लाँचची घोषणा केली. हा शक्तिशाली, उद्योग-सुसज्‍ज टॅब्‍लेट व्‍यवसाय आणि व्‍यावसायिकांना सक्षम करण्‍यासाठी खास डिझाइन करण्‍यात आला आहे.

 

फेब्रुवारी २०२४ मध्‍ये एक्‍सकव्‍हर७ शक्तिशाली स्‍मार्टफोनच्‍या यशस्‍वी लाँचनंतर भारतात लाँच करण्‍यात आलेला उच्‍चस्‍तरीय कार्यक्षमतेने युक्‍त गॅलॅक्‍सी टॅब ॲक्टिव्ह५ एंटरप्राइज एडिशन संरक्षण, सार्वजनिक सुरक्षितता, लॉजिस्टिक्‍स, उत्‍पादन, आरोग्‍यसेवा, रिटेल आणि सेवा अशा आव्‍हानात्‍मक व महत्वपूर्ण क्षेत्रांच्‍या गरजांची पूर्तता करेल.

 

आव्‍हानात्‍मक कामकाज स्थितींसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे

 

गॅलॅक्‍सी टॅब अॅक्टिव्‍ह५ एंटरप्राइज एडिशनमध्‍ये ८.०-इंच (२०.३२ सेमी) हाय-रिझॉल्‍यूशन डिस्‍प्‍लेसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे, तसेच सुलभ मल्‍टीटास्किंग व अधिक कामकाजसाठी ऑक्‍टा-कोअर प्रोसेसरची शक्‍ती आहे. हा टॅब्‍लेट ६ जीबी/१२८ जीबी आणि ८ जीबी/२५६ जीबी अशा मेमरी पर्यायांमध्‍ये येतो. डिस्‍प्‍ले प्रखर प्रकाशात देखील सुस्‍पष्‍टतेसाठी सानुकूल करण्‍यात आला आहे, जो भारतातील विविध हवामान स्थितींमध्‍ये मोठा फायदा आहे.

 

”सॅमसंगमध्‍ये आम्‍ही भारतातील प्रवासाकडे देशाच्‍या स्‍वत:च्‍या महत्त्वाकांक्षेचा भाग म्‍हणून पाहतो. मेक इन इंडिया दृष्टिकोनाशी बांधील राहत आणि डिजिटल इंडियाच्‍या पुढील टप्‍प्‍यामधून प्रेरित होत आम्‍ही भारतातील कर्मचारीवर्गाला आजच्‍या गरजांसह भावी संधींसाठी सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. आम्‍ही उचलणारे प्रत्‍येक पाऊल नाविन्‍यतेने प्रेरित आहे, जे भारतात स्‍थापित व रचण्‍यात आले आहे आणि ग्राहकांच्‍या अद्वितीय महत्त्वाकांक्षा व जीवनशैलीनुसार डिझाइन करण्‍यात आले आहे. हे उत्‍पादनापेक्षा अधिक भारतातील भाषेला प्राधान्‍य देणाऱ्या तंत्रज्ञानाला आकार देण्‍याप्रती आमची कटिबद्धता आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एंटरप्राइज बिझनेसचे उपाध्‍यक्ष पुनीत सेठी म्‍हणाले.

 

तसेच, या टॅबमध्‍ये सतत वापरासाठी ऑल-डे रिप्‍लेसेबल बॅटरी आणि नो-बॅटरी मोड आहे, तसेच ऊर्जा स्रोताशी कनेक्‍ट करता येऊ शकतो. हा टॅब वेईकल ऑटोमेशन, सार्वजनिक सुरक्षितता, संरक्षण, रिटेल किओस्‍क्स, फॅक्‍टरीमधील मजले, लॉजिस्टिक्‍स हब्‍स आणि ग्रामीण प्रदेशांना भेटींसाठी अनुकूल आहे.

 

एंटरप्राइज एडिशन उद्योगामधील अग्रणी ३६ महिन्‍यांची वॉरंटी (बॅटरीवर १२ महिने)सह येतो, तसेच अँड्रॉईड १५ प्रीलोड करण्‍यात आले आहे. ७ वर्षांसाठी ओएस अपग्रेड सपोर्ट (जवळपास व्‍हर्जन २१) आहे. सॅमसंग या श्रेणीमध्‍ये ३६ महिन्‍यांची वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड आहे. विस्‍तारित वॉरंटी आणि एडीएलडी प्‍लॅन्‍स लवकरच उपलब्‍ध असतील.

 

तसेच, हा टॅब ४५१५ रूपयांच्‍या नॉक्‍स सूट एंटरप्राइज सिक्‍युरिटी प्‍लॅटफॉर्मकरिता १२ महिन्‍यांचे मोफत सबस्क्रिप्‍शन देतो, जेथे उद्योगांना प्रीमियम-ग्रेड डिवाईस संरक्षणामधून फायदे मिळतात.

 

गॅलॅक्‍सी टॅब अॅक्टिव्‍ह५ मध्‍ये पुढील सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत:

 

· कोणत्‍याही वातावरणामध्‍ये विनासायासपणे नोंद घेण्‍यासाठी उत्तम डिस्‍प्‍ले आणि आयपी६८-प्रमाणित एस पेन.

 

· कारखाने किंवा बांधकाम साइट्स अशा मोठ्या आवाजाच्‍या ठिकाणी वापरासाठी विशाल, सुस्‍पष्‍ट आवाज देणारे स्‍पीकर्स.

 

· टीमसोबत त्‍वरित कम्‍युनिकेशनसाठी प्रोग्रामेबल कीजसह पुश-टू-टॉक क्षमता.

 

· इनबॉक्‍स कन्‍टेन्‍ट्समध्‍ये डिवाईससह बॅटरी, एस पेन, शक्तिशाली बॅक कव्‍हर आणि डेटा केबलचा समावेश आहे.

 

सहयोग, जे उत्‍पादकतेला साह्य करतात

 

भारतातील उद्योगांना सक्षम करत गॅलॅक्‍सी टॅब अॅक्टिव्‍ह५ एंटरप्राइज एडिशन पुढील सुविधांसह येतो:

 

· ब्रिटी वर्क्स* – तुमच्या कर्मचाऱ्यांना ब्रिटी वर्क्समध्ये १ वर्षाच्या मोफत प्रवेशासह सक्षम करा, सॅमसंग एसडीएसने विकसित केलेले सर्व-इन-वन एसएएएस आधारित सहयोग सोल्‍यूशन, ज्यामध्ये विनासायास, रिअल टाइम सहकार्यासाठी मेल, मेसेंजर, मीटिंग आणि ड्राइव्ह समाविष्‍ट आहेत. याव्यतिरिक्‍त, यात जनरेटिव्ह २ महिने एआय पॉवर्ड ब्रिटी कोपायलट मोफत उपलब्‍ध होते, जो ईमेल स्वयंचलितपणे ड्राफ्ट करतो, रिअल टाइम भाषांतर प्रदान करतो, मीटिंग मिनिट (मीटिंगमधील प्रमुख मुद्दे तयार करतो), ज्‍यामुळे उत्पादकता वाढवण्यास आणि एंटरप्राइजच्या कार्यपद्धतीत बदल करण्यास मदत होते.

 

· झेलो फॉर वर्क* – पुश-टू-टॉक सर्विस क्‍लाऊड सबस्क्रिप्‍शन, जवळपास डिसेंबर २०२५ पर्यंत मोफत उपलब्‍ध.

 

· गुगल वर्कस्‍पेस* – फक्‍त लहान व मध्‍यम व्‍यवसायांसाठी जवळपास ५० टक्‍के सूट.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments