Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedनेत्रदानासाठी डॉक्टरांची धाव ! राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त पिंपळे सौदागर येथे सायकल फेरी...

नेत्रदानासाठी डॉक्टरांची धाव ! राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त पिंपळे सौदागर येथे सायकल फेरी आणि मॅरेथॉनचे आयोजन

पिंपरी चिंचवड, 3 सितम्बर2025 – राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्ताने पिंपळे सौदागर येथे एक विशेष जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये 400 हून अधिक डॉक्टरांनी मॅरेथॉन आणि सायक्लोथॉनमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन मेडिफिट फाउंडेशन आणि पीसीएमसी सायकलिस्ट्स यांनी संयुक्तपणे केले होते, ज्याला डॉ. अग्रवालस्आय हॉस्पिटलचा विशेष पाठिंबा लाभला.

नेत्रतज्ज्ञ व खासदार डॉ. शिवाजी कालगे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली तसेच डॉक्टरांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून शपथ दिली.

मॅरेथॉनमध्ये ५ किमी, १० किमी आणि २१ किमी धावांचा समावेश होता, तसेच २१ किमी सायक्लोथॉनही आयोजित करण्यात आला.

मुख्य आयोजक डॉ. बबन डोळस (हेड – क्लिनिकल सर्व्हिसेस, डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटल, पिंपळे सौदागर) यांनी यावेळी नेत्रदान करण्याचे आवाहन केले. यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला जिल्हा नेत्ररोग शल्यचिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी, मेडिफिट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विवेक बोंडे, पीसीएमसी सायकलिस्टचे अध्यक्ष डॉ. धनराज हेळंबे, सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप ननावरे, पिंपळे सौदागर-वाकड-रहाटणी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गोविंदराम खन्ना, फॅमिली फिजिशियन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजित पाटील यांच्यासह डॉ. तेजस्विनी वळिंबे, डॉ. शिरीष थोरात, डॉ. जयेश पाटील, डॉ. बबन डोळस, डॉ. पद्मनाभ केसकर आणि डॉ. अनिकेत अमृतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी डॉ अग्रवालस् आय हॉस्पिटलचे विशेष सहकार्य ला

भले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments