Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedलक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात 'पुण्याच्या अष्टविनायकांचे' दर्शन* श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर...

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात ‘पुण्याच्या अष्टविनायकांचे’ दर्शन* श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट च्या वतीने आयोजन

 

 

पुणे : वैभवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर जगभरातून भाविक पुण्यामध्ये येतात. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होते. त्यामुळे जगभरातून आलेल्या भाविकांना एकाच ठिकाणी ‘पुण्याच्या अष्टविनायकांचे’ दर्शन व्हावे, याउद्देशाने दत्तमंदिरात हे अष्टविनायक साकरण्यात आले आहेत.

 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट च्या वतीने ‘पुण्याच्या अष्टविनायकांचे’ दर्शन ही आरास मंदिरामध्ये करण्यात आली आहे. यामध्ये मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा श्री केसरी वाडा यांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

 

ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाल्याने भाविकांचा ओढा मोठ्या संख्येने वाढला आहे. पुण्याच्या मध्य भागात मानाचे व प्रमुख मंडळे असे आठ गणपतींचे दर्शन करण्याची इच्छा प्रत्येकाची असते. त्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी हे दर्शन व्हावे, याकरिता दत्तमंदिरात पुण्याच्या अष्टविनायकांची आरास करण्यात आली आहे.

 

श्रीमंत दगडूशेठ व लक्ष्मीबाई या दाम्पत्याचे आध्यात्मिक गुरु इंदौर येथील योग्याभ्यानंद माधवनाथ महाराज यांचे प्रेरणेने स्थापन झालेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन करायला येणारे भाविक आवर्जून श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दर्शनास येतात. या ठिकाणी सुद्धा गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्याने त्यांच्या घरचा गणपती अशी या बाप्पाची महती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments