एडीएएस शो हे एम/एस आयेरा यांच्या सहकार्याने १२ डिसेंबर २०२५ रोजी एआरएआयच्या मोबिलिटी रिसर्च सेंटर, टाकवे, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.
पुणे, ३ सप्टेंबर २०२५: भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील स्वायत्त संस्था, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या महत्वाकांक्षी आणि देशात पहिल्यांदाच उभारलेल्या ” ADAS टेस्ट सिटी” प्रकल्पाची तयारी पूर्ण झाल्याची घोषणा केली. तळेगावजवळील टाकवे येथे २० एकरांवर उभारलेले हे अत्याधुनिक केंद्र भारतीय रस्त्यांचे नेटवर्क प्रत्यक्ष दाखवणाऱ्या एका कृत्रिम शहराच्या स्वरूपात तयार करण्यात आले आहे.
ADAS टेस्ट सिटी ऑटोमोबाईल उद्योगाला प्रगत चालक सहाय्य प्रणाली (ADAS) चाचणी आणि पडताळणी करण्यासाठी सुरक्षित, नियंत्रित आणि पुनरावृत्तीक्षम वातावरण उपलब्ध करून देणार आहे. भारतीय रस्त्यांवरील वास्तव परिस्थितींची पुनर्रचना करून वाहनांच्या सुरक्षिततेसाठीची एडीएएस वैशिष्ट्ये प्रभावीपणे कार्य करत आहेत का, याची पडताळणी करता येणार आहे. देशात प्रथमच ADAS पडताळणीसाठी असे समर्पित रस्ते नेटवर्क विकसित झाले असून हे भारताच्या वाहन तपासणी आणि सुरक्षितता क्षेत्रातील एक महत्त्वाचे टप्पे आहे.
१२ डिसेंबर २०२५ रोजी टाकवे येथील एआरएआय टेस्ट सिटीमध्ये ” ADAS शो” आयोजित करण्यात येणार आहे. एम/एस आयेरा यांच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमाला नामांकित शासकीय अधिकारी, उद्योग तज्ज्ञ आणि जागतिक ऑटोमोबाईल क्षेत्रातील नेते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान एआरएआय त्यांच्या अत्याधुनिक साधनांचा वापर करून थेट ADAS चाचण्यांचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे. देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपन्या, टियर-१ सप्लायर्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कंपन्यांना त्यांच्या वाहनांचे आणि तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी या प्रूव्हिंग ग्राउंडवर आमंत्रित केले जाणार आहे.
एआरएआयचे संचालक डॉ. रेजी माथाई म्हणाले,
“प्रगत चालक सहाय्य प्रणाली (ADAS) ही रस्ते सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची तंत्रज्ञान आहे. उद्योगात सुरक्षित, स्मार्ट आणि टिकाऊ गतिशीलतेचा अवलंब वाढवण्यासाठी एआरएआय कटिबद्ध आहे. आमचे हे आगामी ADAS स्मार्ट सिटी ट्रॅक हे देशातील पहिले समर्पित प्रूव्हिंग ग्राउंड आहे, जिथे वाहन आणि ऑटो-टेक उत्पादक त्यांच्या तंत्रज्ञानाची वास्तव परिस्थितीत कठोर चाचणी आणि पडताळणी करू शकतील. अवजड उद्योग मंत्रालयाचे कॅपिटल गुड्स स्कीम अंतर्गत दिलेल्या सहाय्यामुळे हे मॉड्युलर इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे शक्य झाले आहे. हे केंद्र उत्पादकांना जागतिक दर्जाच्या सुरक्षितता उपाययोजना विकसित करण्यास सक्षम करेल आणि उदयोन्मुख स्टार्ट-अप्ससाठीही देशांतर्गत ADAS /एव्ही तंत्रज्ञान विकासाला चालना देईल. एम/एस आयेरा यांच्या सहकार्याने आयोजित होणारे ADAS शो यांसारखे कार्यक्रम या क्षेत्रातील मुक्त संवाद आणि सहकार्याला प्रोत्साहन देतात. आम्ही १२ डिसेंबर २०२५ रोजीच्या यशस्वी कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.”
एम/एस आयेरा चे संचालक सैयद फरीद अहमद म्हणाले,
“ADAS शो हा भारतातील एकमेव असा मंच आहे जिथे ऑटोमोबाईल नेते, तंत्रज्ञ आणि इनोव्हेटर्स एकत्र येऊन सर्वात प्रगत चालक सहाय्य आणि सुरक्षितता तंत्रज्ञानावर चर्चा करतात. यापूर्वीच्या आवृत्त्यांचे उद्घाटन डॉ. हनीफ कुरेशी, आयपीएस, अतिरिक्त सचिव (ऑटोमोबाईल), अवजड उद्योग मंत्रालय यांच्या हस्ते आयसीएटी येथे झाले होते आणि त्यात होंडा, जेएसडब्ल्यू एमजी मोटर्स, बीएमडब्ल्यू, व्हॉल्वो, महिंद्रा, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी यांसारख्या प्रमुख वाहन निर्मात्यांसह बॉश, झेडएफ, व्हॅलेओ, हार्मन, स्टार्केन, रोस्मर्टा, डसॉल्ट सिस्टेम्स, एनएक्सपी, युनो मिन्डा आणि इतर जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचा सहभाग होता. एडीएएस शो हे वाहन उत्पादक, तंत्रज्ञान कंपन्या आणि चाचणी उपकरण पुरवठादारांना एकत्र आणणारे एक गतिशील आणि ज्ञानवर्धक व्यासपीठ आहे.”
ADAS शोमध्ये थेट दाखविण्यात येणारी तंत्रज्ञान प्रात्यक्षिके:
अॅडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सिस्टम (ACC)
ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन सिस्टम (BSDS)
ऑटोमॅटिक पार्किंग सिस्टम (PAS)
लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टम (LDWS)
ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम (AEBS)
अॅडॅप्टिव्ह फ्रंट लाइट्स सिस्टम (AFLS)
ट्रॅफिक साइन रेकग्निशन सिस्टम (TSR)
फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग सिस्टम (FCW)
ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम (DMS)
नाईट व्हिजन सिस्टम (NVS)
पादचारी ओळख प्रणाली (PDS)
ट्रॅफिक जॅम असिस्टन्स सिस्टम (TJAS)


