नवी दिल्ली,4 सप्टेंबर 2025 : ह्युंडाई मोटर इंडिया लि.चा सीएसआर विभाग असलेल्या ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) ने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी,मद्रासच्या सहकार्याने भारतातील बाल कर्करोग चिकित्सेमध्ये परिवर्तनासाठी ह्युंडाई होप फॉर कॅन्सर उपक्रम सुरू केला आहे.या कार्याप्रती असलेल्या बहुवर्षीय वचनबध्दतेचा एक भाग म्हणून एचएमआयएफ ने या प्रकल्पासाठी 56 कोटी रूपयांच्या गुंतवणूकीची तरतूद केली आहे. चेन्नई येथील आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमध्ये असलेले हृयुंडाई सेंटर फॉर कॅन्सर जेनोमिक्स हे या उपक्रमाच्या केंद्रस्थानी आहे.या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रामध्ये पहिली कम्युनिटी आधारित कॅन्सर टिश्यू बायोबँक आहे,ज्यामुळे लहान मुलांमधील ल्युकेमिया आणि लिम्फोमा यात प्रगत जेनोमिक संशोधन करण्यास मदत होईल.


