Tuesday, September 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedटाटा एआयएने त्यांच्या सर्व युलिप प्लॅनमध्ये बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी बजावली आहे.

टाटा एआयएने त्यांच्या सर्व युलिप प्लॅनमध्ये बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी बजावली आहे.

टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स त्यांच्या युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनद्वारे फंड कामगिरीमध्ये मापदंड स्थापित करत आहे. कंपनीच्या फंडांनी बाजारातील मापदंडापेक्षा चांगली कामगिरी केली आहे, ज्यामुळे पॉलिसीधारकांना दीर्घकालीन वाढ आणि जीवन विमा संरक्षण यांचा परिपूर्ण मिलाप उपलब्ध झाला आहे.

 

टाटा एआयए फंडांची कामगिरी:

 

मागील पाच वर्षांमधील परतावे (सीएजीआर)

 

टाटा एआयए फंड

 

फंड परतावा (%)*

 

बेंचमार्क परतावा (%)*

 

मल्टी कॅप फंड

 

28.27%

 

19.31%

 

टॉप २०० फंड

 

29.07%

 

19.31%

 

इंडिया कन्झम्पशन फंड

 

27.79%

 

19.31%

 

 

 

*३१ जुलै २०२५ पर्यंतचा डेटा. मागील कामगिरी ही भविष्यातील कामगिरीचे सूचक नाही.

 

फंड बेंचमार्क: मल्टी कॅप फंड, इंडिया कन्झम्पशन फंड, टॉप २०० फंड एसअँडपी बीएसई २००

 

सुरुवात झाल्याची तारीख: टॉप २०० फंड: १२ जानेवारी २००९, मल्टी कॅप फंड ५ ऑक्टोबर २०१५

 

टाटा एआयएने गुंतवणुकीशी संबंधित प्लॅनमध्ये सातत्याने बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी बजावत आपली नैपुण्ये सिद्ध केली आहेत. जुलै २०२५ पर्यंत जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त फंड रेटिंग एजन्सी मॉर्निंगस्टार, आयएनसी ने टाटा एआयएच्या ९६% पेक्षा जास्त रेटेड एयुएमला ४ किंवा ५ स्टार रेटिंग दिले आहे, पण त्याचवेळी खाजगी जीवन विमा उद्योगाची सरासरी फक्त ३१% आहे.

 

३१ जुलै २०२५ पर्यंत टाटा एआयएच्या एनएफओची कामगिरी:

 

फंडाचे नाव

 

एयुएम (कोटी रुपयांमध्ये)

 

सुरुवात झाल्याची तारीख

 

सुरुवात झाल्यापासून दिलेले परतावे

 

बेंचमार्क

 

बेंचमार्क परतावे

 

इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज फंड

 

२१९७.८६

 

३१ डिसेंबर २०२२

 

२९.१४%

 

निफ्टी मिडकॅप १०० – ९५% क्रिसिल लिक्विड फंड इंडेक्स – ५%

 

२५.१८%

 

डायनामिक अड्वन्टेज फंड

 

२६९.३२

 

३१ मार्च २०२३

 

२२.६२ %

 

निफ्टी ५०-५०% क्रिसिल कम्पोझिट बॉन्ड फंड इंडेक्स – ५०%

 

१२.४५%

 

सस्टेनेबल इक्विटी फंड

 

८८.१४

 

३१ मार्च २०२३

 

२१.६४%

 

निफ्टी १०० ईएसजी इंडेक्स

 

१९.८०%

 

स्मॉल कॅप डिस्कव्हरी फंड

 

१४७६.१७

 

२४ जुलै २०२३

 

३६.१०%

 

निफ्टी स्मॉल कॅप १००-१००%

 

२४.३१%

 

फ्लेक्सी ग्रोथ फंड

 

८९८.४१

 

३१ डिसेंबर २०२३

 

१९.०२%

 

निफ्टी ५०० इंडेक्स

 

१०.९८%

 

टाटा एआयएच्या योजनांमध्ये पॉलिसीधारकांना उच्च वृद्धी इक्विटी संधींपर्यंत पोहोच आणि त्यासोबत जीवन व आरोग्य विम्याचे लाभ देखील मिळतात. हे फंड उच्च कामगिरी बजावणाऱ्या स्टॉकवर लक्ष केंद्रित करत सर्व मार्केट कॅप्समध्ये जोखीम आणि रिटर्न यांचे संतुलन प्रदान करतात.

 

टाटा एआयएचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर श्री हर्षद पाटील यांनी सांगितले, “टाटा एआयए लाईफमध्ये आमचे गुंतवणूक सिद्धांत आमच्या पॉलिसीधारकांना शाश्वत, दीर्घकालीन मूल्य देण्यावर आधारित आहेत. युवा आणि गतिशील लोकसंख्या, वेगवान शहरीकरण आणि मध्यमवर्गाची वाढती संख्या यामुळे भारतामध्ये होत असलेली लक्षणीय आर्थिक वृद्धी सर्व क्षेत्रांमध्ये अभूतपूर्व संधी निर्माण करत आहे. काटेकोर संशोधन संरचना आणि शिस्तबद्ध बॉटम-अप स्टॉक निवड प्रक्रियेचा लाभ घेऊन, सातत्याने जोखीम-ऍडजस्टेड परतावा सुनिश्चित करत ही क्षमता कॅप्चर करणे आमचे उद्दिष्ट आहे. हा दृष्टिकोन आम्हाला लवचिक पोर्टफोलिओ तयार करण्यात मदत करतो, इतकेच नव्हे तर जगातील सर्वात आकर्षक बाजारपेठांपैकी एकामध्ये आमच्या ग्राहकांच्या संपत्तीची सुरक्षा आणि वृध्दीप्रती आमची वचनबद्धता देखील मजबूत करतो.”

 

पॉलिसीधारकांना लाभ प्रदान करण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करून टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने आपल्या एकात्मिक युलिप योजनांमार्फत बेंचमार्कपेक्षा सरस परतावे देणे आणि जीवन विम्याची नवी व्याख्या रचणे सातत्याने सुरु ठेवले आहे.

 

३१ जुलै २०२५ च्या आकडेवारीनुसार, टाटा एआयएने आपल्या व्यवस्थापनांतर्गत संपत्तीमध्ये १३४,२१५ कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे, म्हणजेच त्यामध्ये साल-दर-साल २०.५५% ची वाढ झाली आहे. व्यक्तिगत गुंतवणूकदारांकडून मिळणाऱ्या नवीन व्यवसायातून येणाऱ्या प्रीमियम उत्पन्नामध्ये आणि अतुलनीय गुंतवणूक कामगिरीमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे हे शक्य झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments