Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorized*३७व्या पुणे फेस्टिवलची सांगता*

*३७व्या पुणे फेस्टिवलची सांगता*

 

 

गेल्या दहा दिवस पुण्यात सुरू असणाऱ्या ‘३७ व्या पुणे फेस्टिवल’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवाची सांगता रंगतदार झाली.

शुक्रवारी रात्री ‘सूर तेच छेडिता’ हा अभिजात मराठी गीतांचा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या समन्वयक प्रसिद्ध गायिका श्रद्धा गायकवाड होत्या. सुप्रसिद्ध संगीतकार आणि पार्श्वगायक हर्षित अभिराज यांचे गायनाने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. गायक पुष्पा चौधरी, उमेश कुलकर्णी, अद्वैत लेले, लीना काळे,तसेच निवेदन लेखिका ऋचा थत्ते यांनी केले.

वाद्य वृंदावर ज्येष्ठ संगीतसंयोजक विवेक परांजपे,श्रीकांत खडके आणि सहकारी यांची साथ संगत मिळाली.

 

३७ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संपन्न झालेल्या ‘मिसेस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धेत २३ ते ४० वर्षे वयोगटात मधुरा गोंधळेकर व ४१ ते ५५ वर्षे वयोगटात सुप्रिया धोंगडे या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. २३ ते ४० वर्षे वयोगटात मधुरा कोष्टी आणि स्नेहा कोठारी आणि ४१ ते ५५ वर्षे वयोगटात पूनम कौर आदर्श आणि सुवर्णा येवलेकर यांनी त्यांच्या गटात अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. सुमेधा भोसले, ईशा हुबळीकर, सारिका सेठ आणि अभिनेते अभ्यंग कुवळेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

या स्पर्धेच्या समन्वयक अ‍ॅड. अमृता जगधने होत्या.

 

३७ व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत झालेली ‘नृत्यझंकार’ महिला नृत्यस्पर्धा आनंदी आणि जोशपूर्ण वातावरणात रंगली. या स्पर्धेत १८ वर्षे ते ६० वर्षे वयोगटातील महिला स्पर्धकांनी १५ सोलो आणि ११ ग्रुप डान्स सादर करत शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, बॉलिवूड शैली, लावणी अशा विविध नृत्यप्रकारांची रंगतदार मेजवानी रसिकांना दिली.

या स्पर्धेचे संयोजन संयोगिता कुदळे यांनी केले होते. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध अभिनेत्री सानिया चौधरी, अभिनेत्री प्रिया कोसुम्बकर यांनी केले. या स्पर्धेतून विजेत्या खालीलप्रमाणे ठरल्या :

सोलो नृत्य विभागात

१. पूजा माळी – लावणी,

२. करिश्मा कोठारी – मुजरा,

३. श्रेया गायकवाड – क्लासिकल

ग्रुप डान्स विभागात

१. भावनाज डान्स ग्रुप – महिषासुर मर्दिनी,

२. रणरागिणी ग्रुप – छावा,

३. मेघवर्षा अकादमी – शिवस्तुती

३७ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिरात “सोनेरी-चंदेरी सांगीतिक मैफल” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या मैफलीत प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल, गायक संजिव मेहेंदळे, मंदार आपटे आणि सहकारी कलाकारांनी सुरेल सादरीकरण केले.

ओंकार पाटणकर (सिंथेसायझर), तुषार दिक्षित (सिंथेसायझर), अमित कुंटे (तबला), रूतुराज कोरे (ऑक्टोपॅड) आणि मोहनिश निश्चल (गिटार) यांच्या वादनाने गायनाला अप्रतिम साथ लाभली. सोनाली श्रीखंडे यांनी निवेदन केले.

पुणे फेस्टिवल मध्ये “रोटरीचे इंद्रधनु” या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे यंदाही करण्यात करण्यात आले होते.

कार्यक्रमात विविध रोटरी क्लब मधील गायक गायिका यांनी गाणी सादर केली. तसेच समूहनृत्य व विडंबनात्मक नाट्यरचनादेखील सादर केल्या.

कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू यांनी प्रास्ताविक केले. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131चे प्रांतपाल रो.संतोष मराठे, फर्स्ट लेडी तनुजा मराठे तसेच पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. हेमा बेल्लड यांनी केले. रो. उर्मिला हळदणकर यांनी आभार मानले.

हे सर्व कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाले. कार्यक्रमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, मोहन टिल्लू, काका धर्मावत आदी उपस्थित होते. पुणे फेस्टिवलचे अतुल गोंजारी व श्रीकांत कांबळे यांनी व्यवस्थापन केले.

 

पुणे फेस्टिवल ‘श्रीं’चे विसर्जन

३७व्या पुणे फेस्टिवल ‘श्रीं’चे विसर्जन शनिवारी सकाळी साडेदहा वाजता झाले. हॉटेल सारस येथे पुणे फेस्टिवल ‘श्रीं’ची विधिवत पूजा पुणे फेस्टिवलचे मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड च्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर वाजत गाजत मिरवणुकीने पर्वती कॅनॉल येथे जाऊन आरती केल्यानंतर ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. याप्रसंगी अॅड. अभय छाजेड, प्रवीण प्र. वाळिंबे, विनोद सुर्वे, नामदेव चाळके, पंडित धनंजय घाटे गुरुजी, सचिन खवले, विजय शेटे व व्हॅलेंटियर्स उपस्थित होते.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments