या फंडच्या केंद्रस्थानी ग्रो म्युच्युअल फंड्सचा – SHAASTRA हा इन- हाउस प्लॅटफॉर्म असून त्यामध्ये मॅक्रो डेटा, मार्केट ट्रेंड्स आणि टेक्निकल सिग्नल यांचा समावेश असून, त्यांद्वारे फंड मॅनेजरला असेट अलोकेशनचे निर्णय घेण्यास मदत केली जाते.
बेंगळुरू, ९ सप्टेंबर २०२५ – ग्रो म्युच्युअल फंडाने ग्रो मल्टी असेट अलोकेशन लाँच केल्याची घोषणा केली आहे. ही ओपन एंडेड योजना इक्विटी, डेट, गोल्ड व सिल्व्हरमध्ये गुंतवणूक करते. न्यू फंड ऑफर (एनएफओ) १० सप्टेंबर २०२५ पासून खुली होणार आहे. ही योजना गुंतवणुकदारांना वैविध्यपूर्ण अलोकेशन फ्रेमवर्क देते, ज्यात वेगवेगळ्या असेट क्लासचा मेळ घालण्यात आला आहे. यामुळे पोर्टफोलिओची अस्थिरता कमी होते आणि बाजारपेठेतील वातावरणाशी सुसंगत गुंतवणूक होते.
मल्टी असेट्समधील गुंतवणूक वेगवेगळे असेट क्लास वेगवेगळ्या परिस्थितीत कशाप्रकारे कामगिरी करतात यावर अवलंबून असते. इक्विटीजना आर्थिक विकासाचे टप्पे आणि कॉर्पोरेट मिळकतीच्या विस्तारातून लाभ होतो. डेट आउटकमवर व्याजदराचे ट्रेंड्स आणि महागाई चक्राचा परिणाम होतो. सोने आणि चांदी प्रामुख्याने अस्थिरता, जागतिक जोखमीच्या घटना आणि चलनी अस्थिरतेला प्रतिसाद देतात. चालना देणारे असे सर्व घटक परस्परांशी फारसे सुसंगत नसल्यामुळे कोणताच एक असेट क्लास जास्त काळासाठी आघाडीवर राहात नाही.
डेटा असे दर्शवतो, की आघाडीचे स्थान बदलत राहाते – काही वर्षांत इक्विटी सर्वात चांगली कामगिरी करतील, काही वेळेस डेट आणि कमॉडिटीजची कामगिरी चांगली होईल. या सर्व असेट्सचा मेळ घालणाऱ्या पोर्टफोलिओने बाजारपेठेतील सर्व टप्प्यांसाठी सज्ज राहाणं आवश्यक आहे.
स्त्रोत: एनएसई, एएमएफआय, ब्लूमबर्ग, १५ जुलै २०२५. यापूर्वी नोंदवण्यात आलेली कामगिरी भविष्यात टिकून राहील असे नाही आणि भविष्यातील परताव्यांची खात्री देऊ शकत नाही. वर नमूद कर्यात आलेली कामगिरी कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या स्वतंत्र योजनेची कामगिरी सूचित करत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
डेटा असे सुचवतो, की मल्टी असेट* पोर्टफोलिओजनी ऐतिहासिकदृष्ट्या व्यापक इक्विटी बाजारांना कमी अस्थिरतेसह तुलनात्मक परतावा दिला आहे.
A screenshot of a computer screen
AI-generated content may be incorrect.
स्त्रोत : एनएसई, एएमएफआय, ब्लूमबर्ग १५ जुलै २०२५| डेटा- विचारात घेतलेला कालावधी: १ जुलै २०१० ते १ जुलै २०२५ (महिन्याअखेरच्या डेटावर आधारित आकडेमोड)
*ग्रो एमएएफ बेंचमार्क: निफ्टी ५०० निर्देशांक – टीआरआय (६० टक्के) + क्रिसिल कॉम्पोझिट बाँड फंड निर्देशांक (३० टक्के) + सोने आयएनआर (५ टक्के) + चांदी आयएनआर (५ टक्के)
इक्विटीज – निफ्टी ५०० निर्देशांक – टीआरआय
यापूर्वी नोंदवण्यात आलेली कामगिरी भविष्यात टिकून राहील असे नाही आणि भविष्यातील परताव्यांची खात्री देऊ शकत नाही. वर नमूद कर्यात आलेली कामगिरी कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या स्वतंत्र योजनेची कामगिरी सूचित करत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
ग्रो मल्टी असेट अलोकेशन फंड हा SHAASTRA (स्ट्रेटेजिक होलिस्टिक असेट अलोकेशन अँड सिस्टिमॅटिक टेक्निकल रिस्क असेसमेंट) या ग्रो म्युच्युअल फंडाच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ग्रो मल्टी असेट अलोकेशन फंड या दृष्टिकोनावर उभारलेला असून त्यात अलोकेशन गुंतवणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असते. SHAASTRAद्वारे मॅक्रो, तांत्रिक आणि मार्केट डेटाचे विश्लेषण करून मार्गदर्शन केले जाते. यामुळे फंड मॅनेजरला माहितीसह निर्णय घेणे, पूर्वग्रह कमी करणे, जोखीम वेळेपूर्वी ओळखणे आणि पोर्टफोलिओचे व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करणे शक्य होते.
फंडाद्वारे मॅक्रोइकॉनॉमिक ट्रेंड्स आणि गुंतवणुकदारांच्या भावना असे दोन्ही घटक लक्षात घेऊन असेट अलोकेशन फ्रेमचा वापर केला जातो. वातावरणानुसार ते विकासाकडे (उदा. ओव्हरवेट इक्विटी) झुकते किंवा जास्त सावध होते किंवा डेट अथवा सोन्याकडे जास्त एक्सपोजर देत बचावात्मक स्थान घेते.
या योजनेमध्ये एकूण इक्विटी एक्स्पोजर ६५ टक्क्यांपेक्षा जास्त कायम राखले जाते व पर्यायाने इक्विटी टॅक्सेशनसाठी पात्र ठरते तसेच डेट, गोल्ड, सिल्व्हर अशा इतर असेट क्लासेससाठी वाटप केले जाते.
A close-up of a white screen
AI-generated content may be incorrect.
नोट – वरील दरांमध्ये अधिभार आणि उपकराचा समावेश करण्यात आलेला नाही. वरील योजनेचे युनिट्स रीडीम केल्यानंतर इंडेक्शेनचे लाभ
प्रचलित कर कायद्यांनुसार
कर परिणामांचे स्वतंत्र स्वरूप लक्षात घेता गुंतवणुकदारांनी त्यांच्या कर सल्लागारांचा सल्ला घ्यावा.
इंडिकेटिव्ह असेट लोकेशन
A screenshot of a computer screen
AI-generated content may be incorrect.
अलोकेशन स्वतःच हाताळणे शक्य नसलेल्या परंतु मल्टीपल असेट क्लासेसचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ग्रो मल्टी असेट अलोकेशन फंड योग्य पर्याय आहे. त्याचप्रमाणे दीर्घकालीन भांडवलवृद्धी आणि संभाव्य कमी नुकसानाचा धोका हवा असलेल्यांसाठीही हा फंड उत्तम आहे. बाजारपेठेतील परिस्थितीनुसार बदल करणाऱ्या पोर्टफोलिओच्या शोधात असलेल्या गुंतवणुकदारांना तसेच वेगवेगळ्या टप्प्यांतील गुंतवणूक प्रवासादरम्यान तुलनेने कमी व्हेरिएबिलीटीस पसंती असलेल्यांसाठी, सोप्या आणि वैविध्यपूर्ण पद्धतीने सुरुवात करू पाहाणाऱ्या- पहिल्यांदाच गुंतवणूक करत असलेल्यांसाठी हा फंड आदर्श आहे.
योजनेचे तपशील
● एएफओ कालावधी: १० सप्टेंबर – २४ सप्टेंबर २०२५
● फंड व्यवस्थापक – श्री. पारस मतालिया, श्री. कौस्तुभ सुळे आणि श्री. विल्फ्रेड गोन्साल्वीज
● किमान गुंतवणूक – रू. ५०० (एकावेळेस), एसआयपी १०० रुपयांपासून
● निर्गमन भार – ३० दिवसांत रीडीम केल्यास १ टक्का आणि त्यानंतर काही नाही.
गुंतवणुकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेची माहिती काळजीपूर्वक वाचावी.


