पुणे दि. 12 (जिमका,वृत्त सेवा) : माजी सैनिक विश्रामगृह, घोरपडी, पुणे येथे अनुभवी सेवानिवृत्त सैनिक व इतर नागरिकांकडून वाहनचालक, पुरुष स्वयंपाकी (कुशल) व प्लंबर (अर्धवेळ) या अशासकीय पदाकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज पाठविण्याची मुदत 19 सप्टेंबर 2025 अशी आहे. अधिक माहितीसाठी 9322326349 या क्रमांकावर संपर्क साधावा असे ले. कर्नल स. दै. हंगे (निवृत्त), उपसंचालक (सैनिकीकरण) यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे
00000


