Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थित  फ्यूएलचा पहिला दीक्षांत समारंभ १४ रोजी 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थित  फ्यूएलचा पहिला दीक्षांत समारंभ १४ रोजी 

 

 

पुणे, १३ सप्टेंबर : शिक्षण, कौशल्य विकास व रोजगारक्षमतेसाठी कार्यरत फ्यूएल शिक्षण संस्था समूहाच्या फ्यूएल बिझनेस स्कूलचा पहिला दीक्षांत समारंभ रविवार, दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.००वा. फ्यूएल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, फॉरेस्ट ट्रील, भूगाव पुणे येथे संपन्न होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षी २०० विद्यार्थ्यांना सीएसआर शिष्यवृत्ती व डिग्री प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती फ्यूएल शिक्षण संस्था समूहाचे अध्यक्ष व सीईओ डॉ. केतन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या सोहळ्याचा एक भाग म्हणून, मा.श्री. नितीन गडकरी फ्यूएल बिझनेस स्कूलमध्ये पीजीडीएम (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स) अभ्यासक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. उद्योन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात भावी नेते घडविण्याच्या फ्यूएलच्या ध्येयातील हा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

वन व्हिजन, वन मिशन आणि स्किल्ड नेशन या तत्वांवर आधारित शिक्षण क्षेत्रात कार्यरत फ्यूएलचा १९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी चीफ मेंटॉर संतोष हुर्लेकोप्पी आणि फ्यूएलच्या सीओओ मयूरी देशपांडे यांची उपस्थित राहणार आहे.

डॉ. केतन देशपांडे यांनी सांगितले की, अंडरग्रॅज्यूएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि सीएसआर समर्थित सर्टिफिकेट प्रोग्रॅम्समधील विद्यार्थ्यांना पदवी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. तसेच सीएसआरमध्ये कार्यरत व्यक्तिंना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम लीडरशिप अवॉर्ड प्रदान केले जाईल. देशातील अग्रगण्य कॉर्पोरेट प्रतिनिधिसह सीएसआर व एचआर पॅनल चर्चासत्र संपन्न होईल.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त फ्यूएल संस्थेला पंतप्रधानांकडून चॅम्पियन्स ऑफ चेंज पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. नुकतेच वर्ल्ड ईकॉनॉमी फोरम २०२५ येथे युवक सक्षमीकरण व कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र शासनाबरोबर महत्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे.

१९ वर्षाच्या प्रवासाचा आणि पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांच्या आकांक्षांचा हा उत्सव आहे. येथे व्यवस्थापनेत पीजी करणारे विद्यार्थी आज देशातील अग्रगण्य उद्योग व व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच आगामी फ्यूएल स्किलटेक युनिव्हर्सिटीला सिप्लाचे अध्यक्ष डॉ.युसुफ हमीद यांचे समर्थन आहे. यांच्या माध्यमातून देशातील युवकांसाठी जागतिक स्तरावरील शिक्षण व कौशल्य संधी निर्माण करण्याचा निर्धार आहे.

आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेच्या स्ट्रॅटेजी आणि पार्टनरशिपचे उपाध्यक्ष सर्वेश कुबेरकर, ऑपरेशन्स व मॅनेजमेंटचे उपाध्यक्ष बाजीप्रभू देशपांडे व मुख्य प्रशासक कर्नल किरण कानडे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments