पुणे, 15 सप्टेंबर 2025: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत रॉकेट्स, इम्पेरियल स्वान्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात जनक वाकणकर, कृष्णनील गोरे, संस्कृती जोशी, अनिकेत सहस्त्रबुद्धे, प्रीती सप्रे, रोहन पै, अनिरुद्ध आपटे, निखिल चितळे यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर रॉकेट्स संघाने हॉक्स 5-4 असा पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या सामन्यात इम्पेरियल स्वान्स संघाने फाल्कन्स ऑप्टिमा संघाचा 5-4 असा पराभव करून विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून तन्मय आगाशे, राजश्री भावे, अमर श्रॉफ, विनीत रुकारी, नेहा लागू, सोहम कांगो, रोहन जोशी, वेदांत धाम यांनी अफलातून कामगिरी केली.
निकाल: साखळी फेरी:
इम्पेरियल स्वान्स वि.वि.फाल्कन्स ऑप्टिमा 5-4(खुला दुहेरी 1: आदित्य काळे/समीर जालन पराभूत वि. नीरज दांडेकर/सारंग आठवले 10-21, 12-21; खुला दुहेरी 2: अजय पटवर्धन/सचिन जोशी पराभुत वि. रणजीत पांडे/संदीप साठे 18-21, 21-20, 12-15; मिश्र दुहेरी 1: तन्मय आगाशे/राजश्री भावे वि.वि.सारा नवरे/वेदांत खटोड 21-15, 21-15; खुला दुहेरी 3: अमर श्रॉफ/विनीत रुकारी वि.वि.ऋषिता खुर्जेकर/जयकांत वैद्य 21-08, 21-06; मिश्र दुहेरी 2: नेहा लागू/सोहम कांगो वि.वि.इरा आपटे/शार्दुल वाळिंबे 21-16, 21-11; खुला दुहेरी 4: रोहन जोशी/वेदांत धाम वि.वि.पार्थ किल्लेदार/राजवीर बोरावके 21-14, 21-14; खुला दुहेरी 5: अश्विन शहा/विमल हंसराज परराभूत वि. अभिजीत राजवाडे/अमित देवधर 16-21, 21-18, 07-15);
रॉकेट्स वि.वि.हॉक्स 5-4(खुला दुहेरी 1: जनक वाकणकर/कृष्णनील गोरे वि.वि.अभिजीत खानविलकर/समीर सावळा 21-10, 21-06; खुला दुहेरी 2: आशुतोष सोमण/अतुल ठोंबरे पराभुत वि. हेमंत पाळंदे/पराग चोपडा 10-21, 12-21; मिश्र दुहेरी 1: संस्कृती जोशी/अनिकेत सहस्त्रबुद्धे वि.वि.अक्षय ओक/राधिका इंगळहळीकर 21-16, 21-13; खुला दुहेरी 3: तुषार मेंगळे/विजय राठी पराभुत वि. अनुज मेहता/, सिद्धांत खिंवसरा 15-21, 12-21; मिश्र दुहेरी 2: प्रीती सप्रे/रोहन पै वि.वि.वरद चितळे/ज्योती राणे 21-15, 13-21, 15-09; खुला दुहेरी 4: क्षितिज कोतवाल/प्रणव मराठे पराभूत वि.अभिषेक ताम्हाणे/यश मेहेंदळे 07-21, 16- 21; खुला दुहेरी 5: अनिरुद्ध आपटे/निखिल चितळे वि.वि.अनिश राणे/अर्जुन खानविलकर 21-14, 18-21, 15-08).


