माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस देश साजरा करत असताना, इंडिया इनकॉर्पोरेशन देखील आपल्या या आदरणीय नेत्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शुभेच्छा देत आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी त्यांची परिवर्तनकारी दृष्टी आणि अढळ वचनबद्धता देशभरातील लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.
या विशेष प्रसंगी, मेक इन इंडियातील आघाडीचे नाव तसेच अभियांत्रिकी आणि संरक्षण उत्कृष्टतेमधील अग्रणी भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बाबा कल्याणी यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत:
“माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छा येत आहेत. या चांगल्या कामात आम्ही देखील सहभागी आहोत. विकसित भारतासाठी त्यांचे परिवर्तनकारी विचार, दूरदर्शी नेतृत्व तसेच निःस्वार्थ सेवा ही देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे. #IndiaFirst उपक्रमाला त्यांचे असलेले प्राधान्य तसेच जागतिक शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठीच्या त्यांच्या दृढ संकल्पाला आमचा सलाम! त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांना देशसेवेसाठी अनेक वर्षे लाभोत, या शुभेच्छा. जय हिंद!” – बाबा कल्याणी, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारत फोर्ज लिमिटेड.
आव्हानात्मक काळातही देशांतर्गत आव्हाने तसेच जागतिक भू-राजकारणाचे त्यांचे असलेले सखोल आकलन आणि या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेले माननीय पंतप्रधानांचे गतिमान नेतृत्व याचे कौतुक करणारा व्हिडिओ संदेश येथे आहे. – भारत फोर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना 75 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते.
माननीय पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसंदर्भात तुम्ही एखादी स्टोरी तयार करत असाल आणि त्यासाठी जर तुम्ही उद्योग क्षेत्रातील प्रतिक्रियांमध्ये याचा समावेश केलात तर आम्हाला मनापासून आनंद होईल.


