पुणे, सप्टेंबर १७, २०२५: एलअँडटी फायनान्स लिमिटेड (एलटीएफ) या देशातील आघाडीच्या नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीने (एनबीएफसी) आपल्या टू-व्हिलर (दुचाकी) फायनान्स ग्राहकांसाठी आकर्षक कर्ज ऑफर्सची घोषणा केली आहे. कंपनीने तीन नवीन ऑफर्स सादर केल्या आहेत, त्या म्हणजे, नो कॉस्ट ईएमआय, प्रॉम्प्ट पेमेंट रिबेट आणि ईएमआय लाइट फेस्टिव्ह (२०२५ मध्ये खरेदी करा, २०२६ मध्ये पेमेंट करा). या योजनेचा उत्सवी खरेदीमध्ये अधिक उत्साहाची भर करण्याचा मनसुबा आहे.
नो कॉस्ट ईएमआय योजनेअंतर्गत ग्राहक कर्जाच्या रकमेवर व्याज आकारल्याशिवाय त्यांच्या खरेदीसाठी आर्थिक साह्य मिळवू शकतात; संबंधित शुल्क फक्त नाममात्र कागदपत्र शुल्क आहे. प्रॉम्प्ट पेमेंट रिबेट योजना किमान ३६ महिन्यांचा परतफेड कालावधी निवडणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, जेथे त्यांना केंद्रीय मंजूरीद्वारे ३५ महिन्यांसाठी ईएमआय यशस्वीरित्या परतफेड केल्यानंतर अंतिम ईएमआयमध्ये सूट मिळते. शेवटचे म्हणजे, ईएमआय लाइट फेस्टिव्ह योजना ग्राहकांना कर्ज मुदतीच्या पहिल्या दोन महिन्यांसाठी त्यांच्या ईएमआयचा फक्त व्याज भरण्याची सुविधा देते, या सुरुवातीच्या कालावधीत त्यांच्या मासिक पेमेंटमध्ये कोणतीही मूळ मुद्दल समाविष्ट केली जात नाही, यामुळे ही योजना २०२५ मध्ये खरेदी करा आणि २०२६ मध्ये पेमेंट करा याची सुविधा देते, ज्यामुळे उत्सवादरम्यान केली जाणारी खरेदी अधिक परवडणारी होईल.
एलटीएफचे अर्बन सेक्युअर्ड अॅसेट्स अँड थर्ड-पार्टी प्रोडक्ट्सचे मुख्य कार्यकारी श्री. जिनेश शाह म्हणाले, “भारतातील शहरी भागामधील ७५ लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्यासह आम्हाला बाजारपेठेच्या गरजांबाबत सखोलपणे माहित आहे. यामुळे आम्हाला आकर्षक टू व्हिलर फायनान्स ऑफरिंग्जची भव्य श्रेणी डिझाइन करता आली, ज्याचा आमच्या संभाव्य ग्राहकांना फायदा होईल. आमची वैविध्यपूर्ण उपस्थिती आणि १०,००० हून अधिक सोर्सिंग पॉइण्ट्सच्या नेटवर्कच्या पाठिंब्यासह आम्हाला विश्वास आहे की, ग्राहक दुचाकी खरेदी करण्यासाठी आणि त्यांचा पसंतीचा फायनान्सर म्हणून आमच्यासह त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या अपवादात्मक संधीचा फायदा घेतील.
आम्हाला सरकारने जाहीर केलेल्या जीएसटी कपातीमुळे दुचाकीसाठी मागणीमध्ये प्रबळ वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि आम्ही आमच्या सहयोगी डिलर आऊटलेट्समध्ये ग्राहकांना त्यांची स्वप्नवत दुचाकी खरेदी करण्यास मदत करण्यासाठी सुसज्ज आहोत.”
या उत्सवी योजना ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी वैध असतील. तसेच, एलटीएफ पात्र ग्राहकांना सर्वोत्तम व्याजदर देत आहे, तसेच कर्जाबाबत निर्णय घेण्यासाठी ५ मिनिटांची जलद टर्नअराऊंड वेळ देते, ज्याला दर्जात्मक डिजिटल प्रक्रिेयेचे पाठबळ आहे, ज्यामुळे ग्राहकांकडून प्रत्यक्ष कोणत्याच कागदपत्रांची गरज भासत नाही.
कंपनीने टॅगलाइन ‘बुमराह की स्पीड पर’सह नवीन टीव्ही कमर्शियल (टीव्हीसी) ‘जस्ट झूम टू-व्हीलर लोन्स’ देखील लाँच केली आहे, ज्यामध्ये त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर जसप्रीत बुमराह आहेत. देशातील १३ बाजारपेठांमध्ये विविध मीडिया खरेदींचा वापर करत इंटीग्रेटेड मार्केटिंग कॅम्पेन (आयएमसी) राबवण्यात
येईल.


