Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात आला पेरी पेरीचा तडका : फिनिक्स मार्केटसिटीमध्ये उघडलं पहिलं नांडोज़ कासा

पुण्यात आला पेरी पेरीचा तडका : फिनिक्स मार्केटसिटीमध्ये उघडलं पहिलं नांडोज़ कासा

 

 

पुणे, 18 सप्टेंबर 2025 – आता पुणेकरांनाही मिळणार आहे पेरी पेरीचा अस्सल मजा! जगभरात लोकप्रिय असलेला फ्लेम-ग्रिल्ड पेरी पेरी चिकन ब्रँड नांडोज़ नं पुण्यात आपलं पहिलं रेस्टॉरंट म्हणजेच ‘कासा’ विमाननगरच्या फिनिक्स मार्केटसिटीमध्ये सुरू केलं आहे. पोर्तुगीज भाषेत ‘कासा’चा अर्थ घर असा होतो.

 

दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, पंजाब, हैदराबाद आणि मुंबईमध्ये रसिकांची मनं जिंकल्यानंतर आता नांडोज़ पुण्यात पोहोचलं आहे.

 

नांडोज़ इंडिया चे सीईओ समीर भसीन म्हणाले, “पुणे हे कल्चर आणि क्रिएटिविटीने भरलेलं शहर आहे, इथले लोक खाण्यापिण्याचे शौकीन आहेत. पुणेकर आम्हाला इतर शहरांमध्ये आणि परदेशातही ट्राय करत आले आहेत. आता आम्ही इथे त्यांना तेच बोल्ड आणि लक्षात राहणारे फ्लेवर देण्यासाठी आलो आहोत. आणि फिनिक्स मार्केटसिटी ही सुरुवातीसाठी उत्तम जागा आहे.”

 

नांडोज़चे सगळे सॉस, मॅरिनेड्स आणि बेस्टिंग्स ताज्या आणि नैसर्गिक घटकांपासून बनवले जातात. यात कुठलेही आर्टिफिशियल फ्लेवर किंवा कलर नाही. चिकन फ्लेम-ग्रिल्ड केलं जातं कारण त्यामुळे खराखुरा स्वाद मिळतो. पेरी पेरी फ्लेवरची रेंज इथे उपलब्ध आहे – ज्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्पायसीनेस निवडू शकता, माइल्ड पासून अगदी एक्स्ट्रा हॉट पर्यंत!

 

रेस्टॉरंटच्या आतलं वातावरणही तितकंच खास आहे – रंगीबेरंगी इंटीरियर, हाताने बनवलेली आर्टवर्क आणि अफ्रो-लुसो म्युझिक तुम्हाला थेट आफ्रिकेचा टच देतील.

 

नांडोज़ आता देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये आपलं आयकॉनिक पेरी पेरी चिकन सर्व्ह करत आहे आणि पुणे या लिस्टमध्ये समाविष्ट झालं आहे.

 

नांडोज़ची जान काय आहे?

ती आहे पेरी पेरी! आफ्रिकन बर्ड्स आय मिरची, जी तिथल्या उन्हात, मातीमध्ये आणि आगीत वाढते. त्यात मिसळतात लिंबू, लसूण आणि मसाले. हा भन्नाट कॉम्बिनेशन असा आहे की लोक पुन्हा पुन्हा यायला भाग पाडतो.

 

मैत्री, आग आणि स्वाद – सगळं काही इथे मिळतं.

सर्वात जवळचं नांडोज़ शोधण्यासाठी भेट द्या: nandosindia.com

आणि अजून रोचक गोष्टींसाठी पाहा: nandos.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments